मनोहर कुंभेजकरमुंबई- येत्या 21 तारखेला विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे शिल्लक 8 दिवस दिवसाची रात्र करून उमेदवार प्रचाराच्या माध्यमातून मतदारांशी पदयात्रा, प्रचारफेरी, चौकसभा, बैठका, जाहिर सभा या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. पण आपल्या मुलाच्या प्रचारात 88 वर्षाचे वडील हिरिरीने भाग घेत आहे.पश्चिम उपनगरातील बोरिवली विधानसभा मतदार संघाचे हे चित्र आहे. बोरिवली विधानसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार सुनील राणे यांचे 88 वर्षाचे वडील दत्ता राणे हे राज्याचे माजी शिक्षण मंत्री होते.
सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचे भाजपाने तिकीट कापून सुनील राणे यांना येथून उमेदवारी दिली.मुंबई भाजपाचे सरचिटणीस असून ते कांदिवली पश्चिम येथील अथर्व अभियांत्रिकी विद्यालयाचे ते सर्वेसर्वा आहे.त्यामुळे कोण हे सुनील राणे अशी चर्चा त्यांना दि,4 ऑक्टोबर रोजी सकाळी जाहिर झाल्यावर राजकीय वर्तुळात व बोरिवलीकरांमध्ये चर्चा सुरू झाली होती.
आज सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत सुनील राणे यांनी बोरिवली पश्चिम लिंक रोडच्या परिसरतील चिक्कू वाडी भागात खासदार गोपाळ शेट्टी,माजी आमदार हेमेन्द्र मेहता यांच्या उपस्थितीत रथावर आरूढ होऊन प्रचार केला.त्यावेळी हे 88 वर्षाचे दत्ता राणे हे आपल्या मुलाबरोबर रखरखत्या उन्हात रथावर आरूढ होऊन ते येथील मतदारांना आपल्या मुलाबरोबर अभिवादन करत होते.ठिकठिकाणी ओवाळून व हार घालून येथील नागरिक सुनील राणे यांचे स्वागत करत होते.यावेळी महायुतीचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
आता मला 88 वे वर्ष लागले अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली आणि शिवडी मतदार संघात 1995 साली दत्ता सामंत यांचा पराभव झाल्यानंतर देखिल मला खास ते भेटायला आले होते आठवण त्यांनी आवर्जून सांगितली.
बोरिवली विधानसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार सुनील राणे यांच्या प्रचारात त्यांचे 88 वर्षांचे वडील व माजी शिक्षण मंत्री दत्ता राणे हिरीरीने सहभागी झाले आहेत.दत्ता राणे हे 1995 ते 1999 या युतीच्या काळात राज्याचे शिक्षणमंत्री होते.त्यांनी 1995 च्या शिवडी येथील विधानसभा मतदार संघात झुंजार कामगार नेते दिवंगत दत्ता सामंत यांचा पराभव केला होता.