जमीर काझीमुंबई : देवनार डपिंग ग्राऊंड आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे कायम चर्चेत राहिलेल्या मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात एकुण १० उमेदवार रिंगणात असलेतरी मुख्य लढत ही सपाचे अबू आझमी आणि शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांच्यातच होणार आहे. या दुरंगी लढतीमागे अनेक कंगोरे असून लोकरे यांना शिवसैनिकांची पूर्ण नाराजी दूर करण्यात यश आले तरच आझमी यांच्या विजयाची हॅटट्रिक रोखण्याला ताकद मिळेल. अन्यथा सायकलीचा मार्ग मोकळा आहे.
दोन्ही कॉँग्रेसचा पांठिबा मिळवित अबू आझमी यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्यात आघाडी घेतली आहे.त्याउलट शिवसैनिकांमध्ये पक्ष प्रमुखांनी ‘आयात’ उमेदवार लादल्याची भावना अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे सैनिकांची नाराजी दूर करण्यामध्ये लोकरे यांना सध्या जोर द्यावा लागत आहे.त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या सुरैया शेख याही नशिब आजमावित आहेत. मात्र त्यांच्यासह अन्य सात उमेदवारांचे अस्तित्व हे केवळ मतदान मशिनवरच असल्याचे सध्याचे चित्र आहे. या मतदारसंघाचे दहा वर्षे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या अबू आझमी यांना गेल्यावेळी दोन्ही कॉँग्रेस आणि एमआयमच्या उमेदवाराशी सामना करावा लागला होता. यावेळी त्यांनी या तीनही पक्षाचा पांठिबा मिळविल्याने मतविभागणीचा धोका टाळला आहे. आपले कौशल्य पणाला लाविध कॉँग्रेसचे बंडखोर नगरसेवक सुफियान वेणू यांना माघार घेण्यास लावली. तर यावेळी तिकीटन न दिल्याने सेनेचे बुलेट पाटील यांनीही बंडखोरी केली होती. मात्र ‘मातोश्री‘च्या सूचनेनेनंतर त्यांचे बंड थंड झाले.परंतू महिन्याभरापूर्वी सेनेत प्रवेश करुन तिकीट मिळविलेल्या नगरसेवक विठ्ठल लोकरे यांच्याबाबत निष्टावंत सैनिकांमध्ये नाराजी कायम आहे. प्रचारात ते सक्रीय झाल्यास दुरंगी लढतीतल रंगत वाढणार आहे.
अबू आझमी : जमेच्या बाजूदहा वर्षापासून प्रतिनिधित्व करीत असल्याने मतदारसंघातील प्रत्येक घटकांशी संपर्क, अल्पसंख्याक समाजाची एकगट्टा व निर्णायक मतदान, कॉँग्रेस आघाडी व एमआयएमचा पांठिबा मिळविल्याने मतविभागणीचा धोका नाही.
उणे बाजू :देवनार डंपिग ग्राऊंड हटविण्यात आलेले अपयश, मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे, काही कॉँग्रेस नेत्यांचा विरोधविठ्ठल लोकरे जमेच्या बाजूकार्यकर्त्यांना सहजपणे उपलब्ध होणारा राजकारणी, नाराज कॉँग्रेसच्या नेत्यांचा छुपा पांठिबा, विद्यमान आमदाराविरुद्धची ‘अॅण्टीइन्कमशी’चा फायदा
उणे बाजू :तिकीट मिळविण्यासाठी कॉँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश घेतल्याचा आरोप, निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी, महायुती अतर्गंत गटबाजीचा फटका बसण्याचा धोका