मुंबई: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी आज वरळी विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आदित्य ठाकरेंनीविधानसभा क्षेत्रात प्रचंड शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील फोन करुन मला शुभेच्छा दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहीनीशी संवाद साधताना सांगितले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मी अर्ज भरण्यासाठी घरातून निघताना आजोबा बाळासाहेबांचे दर्शन घेऊन बाहेर पडलो. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी अर्ज भरल्यानंतर फोन करणार होतो, मात्र मुख्यमंत्र्यांनीच स्वत: फोन करुन मला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही एकत्र काम करु आणि मुख्यमंत्र्यासोबत शिकत शिकत पुढे जाणार असल्याचे देखील आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
कॅश, कार, बँक बॅलन्स अन् बरंच काही... आदित्य ठाकरेंची कोटींची संपत्ती प्रथमच जाहीर
राज्याच्या राजकारणात ५० वर्षांपासून सक्रीय असलेलं ठाकरे घराणं कधीही राजकारणात उतरलेलं नाही. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे असो,वा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेतून बाहेर पडून मनसेची स्थापना करणारे राज ठाकरे, यापैकी कोणत्याही नेत्यानं कधीही स्वत: निवडणूक लढवलेली नाही. मात्र आदित्य ठाकरेंनी ही परंपरा मोडीत काढली आहे.