Maharashtra Election 2019 : '...म्हणून आम्ही 'कलम 370'चा मुद्दा महाराष्ट्रातही मांडतोय, मांडत राहणार!'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 11:06 PM2019-10-12T23:06:39+5:302019-10-12T23:11:02+5:30

भाजपाचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी त्याच मुद्द्यावरून पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

maharashtra election 2019 will not leave article 370 issue in campaign says bjp leader ashish shelar | Maharashtra Election 2019 : '...म्हणून आम्ही 'कलम 370'चा मुद्दा महाराष्ट्रातही मांडतोय, मांडत राहणार!'

Maharashtra Election 2019 : '...म्हणून आम्ही 'कलम 370'चा मुद्दा महाराष्ट्रातही मांडतोय, मांडत राहणार!'

Next

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते अनेक प्रचारसभांमध्ये कलम 370च्या मुद्द्याच्या आधारे प्रचार करत आहेत. त्यावरून विरोधकांनीही भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपाचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी त्याच मुद्द्यावरून पक्षाची भूमिका स्पष्ट केली. 370वर आशिष शेलारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 370 कलमचा मुद्दा का हे भीतीपोटी विरोधक विचारत असतील तर आम्ही त्यांना सोडणार नाही, सळो की पळो करूनच सोडू, 370वर विरोधकांची भूमिका काय असा प्रश्न आम्ही विचारतच राहू, असं म्हणत आशिष शेलारांनी 370च्या कलमावरची भाजपाची भूमिका स्पष्ट केली. 370 कलमाला पवारांनी विरोध केला होता, जर त्यांची अडचण निर्माण होत असेल तरी आम्ही थांबणार नाही. भाजपाचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज लोकमत कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र हासुद्धा देशाचाच भाग आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनाही काश्मीरमध्ये जे 40 हजार मृत्युमुखी पडले, त्याची चिंता आहे. भारत एकसंध राहिला पाहिजे, यासाठी महाराष्ट्रानंही रक्त सांडलेलं आहे. 370च्या बाबतीत जे इम्रान खान यांना वाटते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंबहुना शरद पवारांनाही तसेच वाटत असेल, तर त्यांना अडचणीत येणारा प्रश्न आम्ही विचारणार आहोत. एकदा नाही वारंवार विचारणार, असं म्हणत त्यांनी पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.केवळ 370च्याच मुद्द्यावर प्रचार करतोय, असं नाही. महाजनादेश यात्रा कुठेही 370च्या प्रचारासाठी काढलेली नव्हती. अर्ध्या महाजनादेश यात्रेत तो विषयही नव्हता. आम्ही आमच्या केलेल्या कामांच्या आधारवरच प्रचार केला. आमचे नेते ज्या ज्या भागात सभा घेतात, तिकडचेच प्रश्न मांडतात, अंधेरीत मी सभा घेतली तेव्हा मेट्रोच्या कामामुळे किती तास वाचणार आहेत, याविषयावरच भर दिला. तसेच शिवसेना आणि भाजपा मिळून 220 जागा मिळवू, असा विश्वासही आशिष शेलार यांनी व्यक्त केला. 150 जागा लढवणाऱ्या आमच्याकडे इनकमिंग आहे, भाजपाचा प्रत्येक निर्णय हा कार्यकर्त्याला न्याय देणारा आहे. निष्कलंक आणि पारदर्शी नेतृत्व हे देवेंद्र फडणवीसांचं आहे, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांचंही कौतुक केलं.

नोटाबंदी आणि जीएसटीचा प्रश्न वारंवार का काढता, असं आम्ही विरोधकांना विचारतो का, असा सवालही आशिष शेलारांनी उपस्थित केला. तुम्ही नोटाबंदी आणि जीएसटीचे मुद्दे घेऊन लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलात आणि आपटी खाल्लीत, तरी तुम्ही जीएसटीचा विषय काढत आहात. आम्ही अडचणीत येऊ असे काहीच काम केलेले नाही. त्यामुळे आम्ही आमची भूमिक स्पष्ट मांडत असल्याचंही आशिष शेलारांनी सांगितलं आहे. 
 

Web Title: maharashtra election 2019 will not leave article 370 issue in campaign says bjp leader ashish shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.