Maharashtra Election 2019: ...आणि उमेदवारांनी केला आराम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 04:48 AM2019-10-23T04:48:22+5:302019-10-23T06:06:39+5:30
Maharashtra Election 2019: विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी चांदिवली आणि विलेपार्ले विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी आराम करतानाच कुटुंबीयांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेट घेत निकालावर चर्चा केली.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान संपल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी चांदिवली आणि विलेपार्ले विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी आराम करतानाच कुटुंबीयांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेट घेत निकालावर चर्चा केली.
विलेपार्ले विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार पराग अळवणी यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी थोडा आराम केला. मुलीला वेळ दिला. आता दिवाळीची खरेदी करणार आहे. चांदिवली येथील काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांनी सांगितले की, दुपारी थोडा आराम केला. पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना वेळ दिला. दरम्यान, मी राहतो, तेथील एका सोसायटीमध्ये आगीची दुर्घटना घडली.
परिणामी, त्यांना मदत करण्यासाठी घटनास्थळी दाखल झालो होतो. चांदिवली येथील शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी सांगितले की, आजचा संपूर्ण दिवस कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यात गेला. कार्यकर्त्यांशी चर्चा करतानाच आपला विजय
कसा होईल? याचाही आराखडा बांधला.