Join us

Maharashtra CM: महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री म्हणून आज उद्धव ठाकरे यांचा शपथविधी, नऊ मंत्री घेणार शपथ

By अतुल कुलकर्णी | Published: November 28, 2019 6:45 AM

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गुरुवारी एक नवे पान जोडले जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी ६.४0 वाजता शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

- अतुल कुलकर्णीमुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गुरुवारी एक नवे पान जोडले जाणार आहे. राजकीय अपरिहार्यता म्हणून एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी ६.४0 वाजता शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, एकच उपमुख्यमंत्रिपद असेल आणि ते राष्ट्रवादीकडे असेल, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. ते म्हणाले, विधानसभेचे अध्यक्षपद माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना देणार असून, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचाच असेल. खातेवाटपावरही तिन्ही पक्षांत सहमती झाली आहे. यानुसार, गृह व वित्त खाते राष्ट्रवादीकडे असेल, तर नगरविकास खाते शिवसेनेला आणि महसूल काँग्रेसला मिळेल, असे बैठकीत ठरले आहे.उद्धव ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री होत आहे. ते महाराष्ट्राचे २९वे मुख्यमंत्री असतील. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व एच.डी. देवेगौडा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पंजाबचे कॅप्टन अमरेंद्र सिंग, भूपेश बघेल (छत्तीसगड), व्ही. नारायणस्वामी (पुड्डूचेरी), ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) तसेच चंद्राबाबू नायडू, मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव आदी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे या मान्यवरांना निमंत्रण देण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र सोनिया गांधी व राहुल गांधी शपथविधीही येण्याची शक्यता नसल्याचे कळते.या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातील $४०० शेतकऱ्यांना विशेष निमंत्रित केले आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनाही आमंत्रित करण्यात आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्याच्या दौºयावर असताना एका शेतक-याने मला तुमच्या शपथविधीला बोलवा, अशी विनंती केली होती. त्या शेतकºयास आवर्जून निमंत्रण पाठवले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने भाजपेतर पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणण्याचा खा. शरद पवार यांचा प्रयत्न आहे.शपथविधीची जय्यत तयारीहा शपथविधी सोहळा ऐतिहासिक बनविण्यासाठी शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू आहे. ७० हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. व्यासपीठाची जबाबदारी कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्याकडे आहे. समन्वय समितीसरकार व्यवस्थित चालविण्यासाठी, तसेच उद्धव ठाकरे यांना काँग्रेसकडून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात; तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील व दिलीप वळसे साह्य करतील. सरकार चालविताना काही वादग्रस्त मुद्दे निर्माण झाले तर त्यासाठी शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, स्वत: उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांची समन्वय समिती असणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांतही महाआघाडीराज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढविण्यात येतील. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी हा निर्णय आघाडीच्या बैठकीत आज घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.मंत्रिमंडळात यांना स्थान मिळू शकतेशिवसेना : मुख्यमंत्र्यांसह११ कॅबिनेट व ५ राज्यमंत्रीकॅबिनेट मंत्री : एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, रवींद्र वायकर, उदय सामंत,तानाजी सावंत, अनिल बाबर, शंकरराव गडाख, अनिल परब, सुनील प्रभूराज्यमंत्री : शंभूराज देसाई, दादा भुसे,सुनील राऊत, प्रकाश आबिटकर, सुहास कांदे, आशिष जैस्वाल, ज्ञानराज चौगुले,संजय रायमुलकर, संजय शिरसाटराष्ट्रवादी : ११ कॅबिनेट व ४ राज्यमंत्रीकॅबिनेट मंत्री : अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील,धनंजय मुंडे, नवाब मलिक, राजेश टोपे,अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, सतीश चव्हाण, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणेराज्यमंत्री : धर्मराव आत्राम,बबनदादा शिंदे, मकरंद पाटील, संग्राम गावंडे, दिलीप बनकर, संग्राम जगताप, यशवंत माने, भारत भालके, दत्ता भरणेकाँग्रेस : ९ कॅबिनेट व ३ राज्यमंत्रीकॅबिनेट मंत्री : बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, के.सी. पाडवी,नाना पटोले, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, नितीन राऊत, अमिन पटेलराज्यमंत्री : यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, सुनील केदार, प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे,राजू आवळे, कुणाल पाटील, शिरीष चौधरीमित्रपक्ष : एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीराजू शेट्टी, बच्चू कडू

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019