मुंबई : अजित पवार यांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेसोबतच ठाम राहाण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. शिवाय, राज्यापलांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यामुळ राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली.राज्यात भाजप आणि अजित पवार यांचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे तुमच्या शिवसेनेसोबतच या बैठकांना आता काही अर्थ उरला आहे का? असा थेट सवाल केला असता पटेल म्हणाले, आम्ही कायदेशीर आणि राजकीय पातळीवर हा लढा लढणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचे युद्ध अर्धवट सोडलेले नाही. सरकार आमचेच होईल. भाजपला कोणत्याही परिस्थितीत विश्वासदर्शक ठराव आम्ही मंजूर होऊ देणार नाही, असेही पटेल यावेळी म्हणाले.शिवसेनेसोबत बोलणी करण्यात विलंब झाला का? असे विचारले असता पटेल म्हणाले, बोलणी करण्यात आम्ही कसलाही विलंब केलेला नाही. ज्यादिवशी आम्हाला शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव दिला. त्याच दिवसापासून आम्ही कामाला लागलो होतो.
Maharashtra Government: शिवसेनेसोबतच राहणार, काँग्रेसची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 4:44 AM