सत्ता समीकरणावर याचिका दाखल, मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 03:34 AM2019-11-26T03:34:20+5:302019-11-26T03:35:00+5:30

निवडणुकीनंतर राज्यातील सत्तास्थापनेच्या समीकरणात युतीची ताटातूट झाली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची विचित्र आघाडी करून मतदारांची फसवणूक केली जात आहे.

Maharashtra Election, Maharashtra Government: Petition filed against new Political Alliance in State | सत्ता समीकरणावर याचिका दाखल, मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप

सत्ता समीकरणावर याचिका दाखल, मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप

Next

ठाणे - निवडणुकीनंतर राज्यातील सत्तास्थापनेच्या समीकरणात युतीची ताटातूट झाली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची विचित्र आघाडी करून मतदारांची फसवणूक केली जात आहे. याचाच जाब विचारण्यासाठी ठाण्यातील प्रिया चौहान कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मतदारांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या याचिकेत म्हटले आहे की, निकालानंतर महाराष्ट्रात युतीची सत्ता प्रस्थापित होईल, याच मानसिकतेतून मतदारराजाने शिवसेनेला मतदान केले. निकालानंतर मात्र युती तुटली. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसही सत्तेत सहभागी होत असल्याने ज्या मतदारांनी युतीला मतदान केले, त्या मतदारांची घोर फसवणूक झाली आहे. राज्यातील मतदारांचा हा अपमान आहे. त्यामुळे मतदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असेही या याचिकेत कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Petition filed against new Political Alliance in State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.