Join us

आमदार झाले घासून आणि ठासून! मुंबईतील लढती ठरल्या रंगतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:08 IST

विधानसभेची यंदाची निवडणूक मुंबईत अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली. शिवसेनेच्या फुटीनंतर झालेल्या या निवडणुकीला अनेक कंगोरे होते.

सुरेश ठमके मुंबई :

विधानसभेची यंदाची निवडणूक मुंबईत अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची झाली. शिवसेनेच्या फुटीनंतर झालेल्या या निवडणुकीला अनेक कंगोरे होते. त्यामुळे काही उमेदवार घासून येणार की ठासून? याबाबत चर्चा सुरू होती. अनेक दिग्गज उमेदवार ठासून येण्याची भाषा करत असताना अत्यंत कमी मताधिक्याने अर्थात घासून आल्याचे चित्र पाहायला मिळाले; तर काही उमेदवारांना अनपेक्षितपणे प्रतिस्पर्धी उमेदवारावर मोठ्या मताधिक्याने विजय अर्थात ठासून विजय मिळवता आला. 

मुंबई आणि उपनगरांतील अनेक मतदारसंघांमध्ये उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना अथवा भाजप विरुद्ध उद्धवसेना आणि काही मतदारसंघांत काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळाली. मुंबईत अजूनही काही मतदारसंघांवर प्रभाव असलेल्या मनसेच्या उमेदवारांमुळे तिरंगी लढतही झाली. या तिरंगी लढतीमुळे ज्या ठिकाणी मनसेची ताकद आहे, तेथे अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. ज्यामध्ये काही उमेदवारांना अत्यंत कमी मताधिक्याने निसटता विजय मिळवता आला. ज्या मतदारसंघांमध्ये मनसे फारशी प्रभावी नव्हती, त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने मते मिळवण्याचा प्रयत्न केला, तरी ‘वंचित’ला अत्यंत कमी मते मिळाली. त्यामुळे अशा मतदारसंघांमध्ये झालेल्या थेट लढतीत काही उमेदवारांनी ५० हजार ते ९० हजारांपर्यंतचे मताधिक्य मिळवत ते जायंट किलर ठरले. 

पश्चिम उपनगरांतील बोरिवली आणि चारकोप या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मताधिक्य भाजपच्या उमेदवारांनी मिळवले तर दक्षिण मुंबईतील माहीम आणि जोगेश्वरी मतदारसंघात उद्धवसेनेच्या उमेदवारांना विजयासाठी झुंजावे लागले. ३६ मतदारसंघांमध्ये दहा हजारांपेक्षा  कमी मताधिक्य मिळवलेल्या मतदारसंघांमध्ये १० मतदारसंघांचा समावेश आहे; तर ३५ हजार ते ९० हजारांपर्यंतच्या मताधिक्यामध्ये १० मतदारसंघांचा समावेश आहे.

कमी मतांनी विजय माहीम :महेश सावंत (उद्धवसेना)    ५०,२१३सदा सरवणकर (शिंदेसेना)    ४८,८९७१,३१६ मतांनी विजयजोगेश्वरी पूर्व :अनंत नर (उद्धवसेना)    ७७,०४४मनीषा वायकर (शिंदेसेना)    ७५,५०३१,५४१ मतांनी विजय वर्सोवा :हारुण खान (उद्धवसेना)    ६५,३९६डॉ. भारती लव्हेकर (भाजप)    ६३,७९६१,६०० मतांनी विजय अणुशक्तीनगर :सना मलिक (अजित पवार गट)    ४९,३४१फआद अहमद (शरद पवार गट)    ४५,९६३३,३७८ मतांनी विजय 

५ ते १० हजार मताधिक्यसायन कोळीवाडा :कॅ. आर. तमिळ सेल्वन (भाजप)    ७३,४२९गणेशकुमार यादव (काँग्रेस)    ६५५३४ ७,८९५ मतांनी विजय वरळी :आदित्य ठाकरे (उद्धवसेना)        ६३,३२४मिलिंद देवरा (शिंदेसेना)    ५४,५२३८,८०१ मतांनी विजयभांडुप पश्चिम :अशोक पाटील (शिंदेसेना)    ७७,७५४रमेश कोरगावकर (उद्धवसेना)    ७०,९९०६,७६४ मतांनी विजय शिवडी :अजय चौधरी (उद्धवसेना)    ७४,८९०बाळा नांदगावकर (मनसे)    ६७,७५० ७,१४० मतांनी विजय

५० हजारांपेक्षा अधिक मताधिक्यबोरीवली :संजय उपाध्याय (भाजप)  १,३९,९४७संजय भोसले (उद्धवसेना)  ३९,६९०१,००,२५७ मतांनी विजय

मुलुंड :मिहीर कोटेचा (भाजप) १,३१,५४९राकेश शेट्टी ४१,५१७९०,०३२ मतांनी विजय

कांदिवली पूर्व :अतुल भातखळकर भाजप १,१४,२०३कालू बुधेलिया काँग्रेस ३०,६१०८३,५९३ मतांनी विजय 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024मुंबई