Maharashtra Farmer's Protest LIVE : शेतकरी आणि आदिवासींचा उलगुलान मोर्चा आझाद मैदानात दाखल

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 07:49 AM2018-11-22T07:49:13+5:302018-11-22T12:01:15+5:30

मुंबई - शेतकरी आणि आदिवासींचा लोकसंघर्ष मोर्चा सोमय्या मैदानातून आझाद मैदानात दाखल झाला आहे. वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, ...

Maharashtra Farmer's Protest LIVE : शेतकरी आणि आदिवासींचा उलगुलान मोर्चा आझाद मैदानात दाखल | Maharashtra Farmer's Protest LIVE : शेतकरी आणि आदिवासींचा उलगुलान मोर्चा आझाद मैदानात दाखल

Maharashtra Farmer's Protest LIVE : शेतकरी आणि आदिवासींचा उलगुलान मोर्चा आझाद मैदानात दाखल

Next

मुंबई - शेतकरी आणि आदिवासींचा लोकसंघर्ष मोर्चा सोमय्या मैदानातून आझाद मैदानात दाखल झाला आहे. वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी हा मोर्चा काढला आला आहे. ठाणे, पालघर, भुसावळ जिल्ह्यातील आदिवासी आणि मराठवाड्यातील शेतकरी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत.  

(शेतकरी व आदिवासींचा आज आझाद मैदानात झंझावात!)

...तर मंत्रालयावर शेतकरी कूच करणार
शेतकऱ्यांच्या उलगुलान मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत सरकारने चर्चा करण्यासाठी आज दुपारी 1.30 वाजताची वेळ दिलेली आहे. मात्र या चर्चेत समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत व निर्णय झाले नाही तर प्रत्येक शेतकर्‍याने दोन किलो तांदूळ आणि एक किलो डाळ अशी शिधा सोबत आणलेली आहे. चार वेळेस जेवणाला पुरेल इतकी शिधा शेतकऱ्यांकडे आहे. ही शिधा संपल्यावर हजारो शेतकरी आझाद मैदानातील ठिय्या सोडून मंत्रालयावर कूच करेल आणि आपल्या मागण्या मान्य करून घेईल, असा इशारा लोकसंघर्ष मोर्चाच्या महासचिव व उलगुलान मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिला आहे.

LIVE

Get Latest Updates

12:17 PM

100 वर्षीय आदिवासी नेत्या जिलाबाई वसावे यांनी विद्रोही गीत केलं सादर

11:56 AM

ही माती घेऊन शेतकरी-आदिवासींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार

या मातीत बाण रोवून हक्काच्या जमिनी घेतल्याशिवाय माघार घेणार नाही,  शेतकरी नेत्यांचा निश्चय 

11:51 AM

शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आमदार विद्या चव्हाण आणि आमदार शशिकांत शिंदे आझाद मैदानात दाखल.

11:48 AM

लोकसंघर्ष संघटनेचा उलगुलान मोर्चा आझाद मैदानात

11:20 AM

मोर्चा आझाद मैदानात दाखल

जे.जे उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर शेतकरी आणि आदिवासींचा मोर्चा सीएसटी स्थानकाऐवजी महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूने वळवण्यात आला. येथून सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मागील बाजूने महापालिका मार्गे हा मोर्चा आता आझाद मैदानात दाखल झाला आहे.

10:35 AM

10 मिनिटांपूर्वी शेतकऱ्यांचा मोर्चा जे.जे.उड्डाणपुलावरुन आझाद मैदानाकडे गेला, परिसरातील वाहतूक सुरळीत सुरू, मोर्चा शिस्तबद्ध असल्याचे उदाहरण

10:18 AM

10:18 AM

जे.जे. उड्डाणपूल

10:08 AM

दक्षिण मुंबईतील वाहतूक सुरळीत

10:05 AM

शेतकरी-आदिवासींचा उलगुलान मोर्चा नागपाडा जंक्शन येथे पोहोचला

09:57 AM

मुंबईतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी शेतकऱ्यांचा मोर्चा दक्षिणेकडून उत्तरेकडे चालणाऱ्या वाहन मार्गांवरून मार्गक्रमण. दक्षिण मुंबईकडे येणारी वाहतूक सुरळीत. 

09:53 AM

मुंबई : शेतकरी-आदिवासींचा मोर्चा सकाळी 9 वाजता दक्षिण मुंबईत दाखल,10 वाजता नागपाडा जंक्शन ओलांडून जे. जे. उड्डाणपुलावर मार्गक्रमण  

09:31 AM

शेतकरी-आदिवासींचा मोर्चा दादरमध्ये पोहोचला



 

08:39 AM

दादर, परळहून सायनकडे जाणारी वाहतूक बंद

08:12 AM

आझाद मैदानातील आंदोलकांची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली भेट; मागण्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे दिले आश्वासन

08:11 AM

 मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदानातच शेतकरी आणि आदिवासी ठिय्या देणार
 

08:10 AM

पहाटे 4.30 वाजता सोमय्या मैदानातून निघालेला शेतकरी आणि आदिवासींचा लोकसंघर्ष मोर्चा आझाद मैदानाकडे रवाना
 

08:10 AM

सायन ते दादर, परळपर्यंत वाहतूक सुरू मात्र मोठी कोंडी 

Web Title: Maharashtra Farmer's Protest LIVE : शेतकरी आणि आदिवासींचा उलगुलान मोर्चा आझाद मैदानात दाखल

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.