Maharashtra Flood: मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 03:10 PM2019-08-13T15:10:03+5:302019-08-13T15:10:51+5:30

राज्यातील सर्व मंत्री पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एक महिन्याचं वेतन देणार आहेत.

Maharashtra Flood: All ministers, including chief ministers, will pay one month's salary to flood victims | Maharashtra Flood: मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार 

Maharashtra Flood: मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार 

googlenewsNext

मुंबई - कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या लोकांच्या मदतीला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु असून मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन पूरग्रस्तांना मदत करणार आहेत. 

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पूरग्रस्तांसाठी याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार, आमदारांनी एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजपा लोकप्रतिनिधींनी एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना द्यावं अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे तर शिवसेनेकडूनही नगरसेवक, आमदार, खासदार यांचे एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्वपूर्ण निर्णय 

1.    राज्यातील सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह इतर जिल्ह्यात पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत केंद्र सरकारकडे 6813 कोटींची मागणी करणार.
2.    जागतिक बँकेच्या सहाय्याने केंद्र शासन पुरस्कृत स्कील स्ट्रेंदनिंग फॉर इंडस्ट्रियल व्हॅल्यू 
एनहान्समेंट (STRIVE) प्रकल्प महाराष्ट्र राज्यात राबविण्यास मान्यता.
3.    राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य व उद्योजकता विकास तसेच क्षमता वृद्धिंगत (Capacity Building) करण्यासंदर्भातील योजनांचे एकसुत्रीकरण.
4.    डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेची व्याप्ती वाढवून गावात वन्यप्राण्यांकडून होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी संवेदनशील गावांच्या वनसीमेवर प्रायोगिक तत्त्वावर लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्याचा निर्णय.
5.    महापौर व उपमहापौर यांच्या निवडणुका विधानसभेची आगामी सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत तीन महिने पुढे ढकलण्यास मंजुरी.
6.    नागपूर येथील महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या सेवानिवृत्त 371 कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यास मान्यता.
7.    महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या पहिल्या अनुसूचीमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागास नेमून दिलेल्या विषयांमध्ये मराठा आरक्षण, राज्य मागासवर्ग आयोग व इतर संबंधित विषयांचा समावेश.
8.    मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी.
9.    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामध्ये तत्कालीन कालावधीत विविध पदांवरुन गैरप्रकार केलेल्यांबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी.
10.    संगमनेर (जि. अहमदनगर) येथील मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 76 क्रीडांगणातून 4250 चौरस मीटर क्षेत्र आरक्षणातून वगळून प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान या प्रयोजनासाठी आरक्षित करण्यास मंजुरी.
11.    भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्र विकास योजनेतील, पिंपळास तसेच रांजनोळी (ता. भिवंडी) येथील निर्देशित क्षेत्र खेळाचे मैदान या आरक्षणामधून वगळून वाणिज्य वापर विभागात समाविष्ट करण्यास मंजुरी.
12.     महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ या उपक्रमाच्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी. 

Web Title: Maharashtra Flood: All ministers, including chief ministers, will pay one month's salary to flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.