महाराष्ट्र सुखावला; यंदा १६ टक्के अधिक पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 05:34 AM2020-08-19T05:34:18+5:302020-08-19T05:34:37+5:30

दरवर्षी दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात यंदा तो सर्वाधिक बरसला, मात्र राज्यात पाच जिल्ह्यांमध्ये त्याने तुरळक हजेरी लावली.

Maharashtra good news; 16 percent more rain this year | महाराष्ट्र सुखावला; यंदा १६ टक्के अधिक पाऊस

महाराष्ट्र सुखावला; यंदा १६ टक्के अधिक पाऊस

Next

सचिन लुंगसे 
मुंबई : मान्सूनचे आगमन झाल्यानंतर जून, जुलै महिन्यात कोकण मराठवाड्यासह राज्याच्या काही भागातच सक्रीय असलेला पाऊस आॅगस्ट महिन्यात मुंबईसह राज्यात सर्वदूर बरसल्याने महाराष्ट्र सुखावला आहे. १ जूनपासून राज्यात आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत १६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे पावसाचा चांगला जोर असल्याने धरणेही भरू लागली आहेत. दरवर्षी दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात यंदा तो सर्वाधिक बरसला, मात्र राज्यात पाच जिल्ह्यांमध्ये त्याने तुरळक हजेरी लावली.
>पाण्याची चिंता मिटली
मुंबईला पाणीपुरवठा करणाºया सात तलावांपैकी विहार व तुळशी तलाव भरून वाहू लागले आहेत. मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा हे मोठे तलाव जवळपास ९० टक्के भरले आहेत. मुंबई, ठाण्याची पाण्याची चिंता मिटली आहे.
>कोणत्या जिल्ह्यांत किती अधिक पाऊस (टक्क्यांत)
मुंबई शहर (६८), मुंबई उपनगर (६०), रायगड (२), रत्नागिरी (२०), सिंधुदुर्ग (४१), धुळे (४१), अहमदनगर (९८), पुणे (१६), सांगली (२०), कोल्हापूर (८), सोलापूर (७१), औरंगाबाद (८७), जळगाव (१०), बीड (७७), उस्मानाबाद (२१), लातूर (२०), जालना (४३), बुलढाणा (५), परभणी (१४), हिंगोली (७), वाशिम (१०), नागपूर (७)
>सहा जिल्ह्यांत ६० टक्क्यांहून अधिक पाऊस
मुंबई शहरात ६८ टक्के आणि उपनगरात ६० एवढ्या अधिकच्या पावसाची
नोंद झाली. मुंबई शहर, मुंबई उपनगर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड,
सोलापूर या जिल्ह्यांत ६० टक्क्यांहून अधिक पाऊस नोंदविण्यात आला.
>१ जूनपासून आतापर्यंत किती होतो पाऊस?
दरवर्षी : सरासरी ७१३.७ मिलिमीटर पाऊस होतो
यंदा : ८२६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
>पावसाची तूट (टक्क्यांत)
पालघर (१०), ठाणे (६), नाशिक (४), वर्धा (१०), नंदुरबार (२८), सातारा (१४), नांदेड (६), अकोला (३२), अमरावती (२३), यवतमाळ (२६), चंद्रपूर (७), भंडारा (७), गडचिरोली (१८), गोंदिया (२३).
>अशी आहे धरणांची स्थिती
विभाग धरणांची उपयुक्त पाणीसाठा
संख्या आजचा गतवर्षीचा
नागपूर ३८४ ६१.६१% ३६.२१%
अमरावती ४४६ ४0.१४% २६.९६%
औरंगाबाद ९६४ ४५.८८% ३0.३४%
कोकण १७६ ७0.३२% ८५.४४%
नाशिक ५७१ ४७.५१% ६0.३६%
पुणे ७२६ ६0.९२% ८४.३१%
एकूण ३२६७ ५४.९९% ५९.८६%

Web Title: Maharashtra good news; 16 percent more rain this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस