Maharashtra Govemrnent: पंतप्रधान देशाचे आहेत; राज्यातील लहान भावाला साथ देण्याची जबाबदारी मोदींनी घ्यावी, अन्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 07:55 AM2019-11-29T07:55:37+5:302019-11-29T07:56:09+5:30

पाच वर्षांत पाच लाख कोटींचे कर्ज राज्यावर लादले व फडणवीस सरकार गेले.

Maharashtra Govemrnent: The Prime Minister belongs to the country; Modi should take the responsibility of supporting the Uddhav Thackeray in the state, otherwise | Maharashtra Govemrnent: पंतप्रधान देशाचे आहेत; राज्यातील लहान भावाला साथ देण्याची जबाबदारी मोदींनी घ्यावी, अन्यथा

Maharashtra Govemrnent: पंतप्रधान देशाचे आहेत; राज्यातील लहान भावाला साथ देण्याची जबाबदारी मोदींनी घ्यावी, अन्यथा

Next

मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी केंद्रालाच सहकार्याचा हात पुढे करावा लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिवसेनेचे बिनसले आहे, पण नरेंद्र मोदीउद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावा-भावाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी यांची आहे असं सामना अग्रलेखातून शिवसेनेनं म्हटलं आहे. 

तसेच पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, एका पक्षाचे नसतात हे सूत्र ठेवले तर जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांच्या सरकारविषयी मनात राग-लोभ का ठेवायचा? महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेल्या निर्णयाचा मान दिल्लीने ठेवावा व सरकारच्या स्थैर्याला चूड लागेल असे काही घडू नये याची काळजी घ्यावी असा सूचक इशाराही देण्यात आलेला आहे. 

सामना अग्रलेखातील महत्वाची मुद्दे

  • महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी जनता दिल्लीशी झुंजली. संघर्ष केला. संघर्ष आणि लढे आमच्या पाचवीलाच पुजले आहेत. दिल्ली देशाची राजधानी जरूर आहे, पण महाराष्ट्रही दिल्लीश्वराचा गुलाम नाही 
  • बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा बाणा आणि सरकारचा कणा ताठ राहील याची खात्री बाळगायला हरकत नाही.
  • महाराष्ट्राचे राजकारण आज अशा अवस्थेला पोहोचले आहे की, शिवरायांचे हे राज्य देशाचे मार्गदर्शक बनले आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे फक्त सत्ताकारण नसते तर चळवळ असते. नव्या सरकारविषयी तेच म्हणायला हवे. 
  • नित्याचे विचार आणि व्यवहार मागे पडून विशिष्ट विचार-व्यवहार जेव्हा साऱया लोकांमध्ये बलवत्तर होतो त्या वेळी अशा चळवळींना लोकांच्या मनात स्थान मिळत असते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सत्य व न्यायाच्या सर्व कसोटय़ांवर उतरून स्थिरस्थावर होईल. 
  • पाच वर्षांत पाच लाख कोटींचे कर्ज राज्यावर लादले व फडणवीस सरकार गेले. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प योजले आहेत त्यावर वेगाने, पण सावधपणे पावले टाकावी लागतील. पंतप्रधान मोदी यांनी नव्या सरकारला व मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राने गतिमान विकास घडवावा, असे आमच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले. त्यासाठी केंद्राची भूमिका सहकार्याची हवी.  
  • महाराष्ट्रास छत्रपती शिवरायांनी जे दिले त्यात स्वाभिमान महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र दिल्लीस सर्वाधिक पैसा मिळवून देतो. देशाचे अर्थकारण मुंबईवर चालले आहे. 
  • देशाला सर्वाधिक रोजगार मुंबईसारखी शहरे देत आहेत. देशाच्या सीमांवर महाराष्ट्राचे जवान शहीद होत आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण हे तर महाराष्ट्राचे पिढीजात कर्तव्यच आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर आता अन्याय होणार नाही व सन्मान राखला जाईल याची काळजी नव्या मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल. 
  • दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्र चौथ्या-पाचव्या रांगेत उभा राहणार नाहीच, तर अग्रभागी राहून तो कर्तृत्व गाजवील असे परंपरा सांगत आहे. याच परंपरेचा भगवा ध्वज महाराष्ट्राच्या विधानसभेवर, मंत्रालयावर फडकला आहे. भगव्या ध्वजाशी वैर घेऊ नका. वैर घ्याल तर स्वतःचेच नुकसान करून घ्याल. महाराष्ट्रात सुराज्याचा उत्सव सुरू झाला आहे. बघता काय? सामील व्हा!
     

Web Title: Maharashtra Govemrnent: The Prime Minister belongs to the country; Modi should take the responsibility of supporting the Uddhav Thackeray in the state, otherwise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.