Maharashtra Government: महाविकास आघाडीचा जल्लोष तर भाजप सदस्य हिरमुसलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 05:31 AM2019-12-01T05:31:58+5:302019-12-01T05:35:02+5:30

अधिवेशन दुपारी २ वाजता होते मात्र सकाळपासून सर्व पक्षांचे आमदार विधानसभेत आले होते.

Maharashtra Government: BJP leader upseted, mahavikas aaghadi enjoyed | Maharashtra Government: महाविकास आघाडीचा जल्लोष तर भाजप सदस्य हिरमुसलेले

Maharashtra Government: महाविकास आघाडीचा जल्लोष तर भाजप सदस्य हिरमुसलेले

Next

मुंबई : महाविकास आघाडीने १६९ मतांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेना सदस्यांमध्ये प्रचंड जल्लोषाचे वातावरण होते. या तिन्ही पक्षांचे सदस्य एकमेकांची गळाभेट घेत होते, टाळ््या देत होते. हेच सदस्य एकमेकांच्या विरोधात लढले असे सांगूनही खरे वाटणार नाही इतका एकोपा या तिन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये दिसून येत होता. भाजप सदस्यांमध्ये मात्र नाराजीची छटा स्पष्ट दिसत होती.

अधिवेशन दुपारी २ वाजता होते मात्र सकाळपासून सर्व पक्षांचे आमदार विधानसभेत आले होते. मतदान कशा पध्दतीने होणार, त्यासाठी काय काळजी घ्यायची याची सगळी माहिती तीन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना बैठका घेऊन दिले. नव्या आमदारांची तर तालीमही करुन घेतली गेली. विधानसभेत उध्दव ठाकरे यांचे आगमन होताच शिवसेनेने घोषणा सुरु केल्या.

जय भवानी, जय शिवाजी, उध्दव ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा झाल्या. तर राष्टÑवादीच्या आमदारांनी शरद पवार यांचा विजय असो, अशा घोषणा दिल्या. त्यावेळी काँग्रेस सदस्य मागे कसे राहतील. त्यांनी सोनिया गांधी, राहूल गांधी यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. ते पाहून विरोधी बाकांवर बसलेल्या भाजप सदस्यांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली.

सभागृहात उध्दव ठाकरे आले तेव्हा त्यांना एकनाथ शिंदे यांनी पहिल्या रांगेतील सगळ्या नेत्यांकडे नेले. विरोधी बाकावरील सगळ्यांशी हस्तांदोलन करत ते सत्ताधारी बाकांवर आले तेवढ्यात सभागृहात देवेंद्र फडणवीस आले. तेव्हा पुन्हा ठाकरे त्यांच्याजवळ गेले, त्यांच्या खांद्यावर हात टाकला. त्यांच्याशी हस्तांदोलनही केले.

भाजपच्या अनेक सदस्यांनी विधानभवनात माध्यमांशी बोलताना आम्ही थोडी घाई केली असती तर तुमचे सरकार बनू शकले नसते अशी खंतही बोलून दाखवली. बहूमत सिध्द झाल्यानंतर मात्र भाजपचे आमदार त्यांची नाराजी लपवू शकले नाहीत. महाविकास आघाडीला समर्थन देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख, ‘राजा हरिश्चंद्र’ असा केला. एमआयएमचे मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी आपल्यासह पक्षाचे दोन आमदार तटस्थ असल्याचे सांगत सरकारला राज्याच्या विकासासाठी आमचा मुद्यांवर आधारित पाठिंबा राहील, असे सांगितले.

Web Title: Maharashtra Government: BJP leader upseted, mahavikas aaghadi enjoyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.