मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता शेतीसाठी दिवसाही मिळणार वीज, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 05:05 PM2023-04-19T17:05:19+5:302023-04-19T17:08:52+5:30

शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

maharashtra government cabinet decisions A big decision for farmers in the cabinet meeting Now you will get electricity for agriculture even during the day, read in detail | मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता शेतीसाठी दिवसाही मिळणार वीज, वाचा सविस्तर

मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता शेतीसाठी दिवसाही मिळणार वीज, वाचा सविस्तर

googlenewsNext

मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे.  शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा त्याचप्रमाणेवर्ष २०२५ पर्यंत ३० टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 

मुंबईच्या रस्त्यावरून आदित्य ठाकरे कडाडले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिले

या योजनेचा लाभ राज्यातील कृषी वीज ग्राहकांना होईल. वीज खरेदी करारानुसार वीज बिलाची रक्कम देण्यासाठी ७०० कोटी रुपयांचा स्वतंत्र रिव्हॉल्विंग फंड देखील स्थापन करण्यात येणार आहे. चालू वर्षासाठी यासाठी १०० कोटी रुपये इतका निधी, हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यात येईल. 

या अभियानात वीज वाहिनीसाठीची जमीन अकृषी करण्याची गरज राहणार नाही. तसेच अशा जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्पांना ३० वर्षांपर्यंत सर्व कर व शुल्कांतून सूट देण्यात येईल. कृषी वीज वाहिनी योजनेसाठीची जमीन नाममात्र एक रुपया वार्षिक भाडे पट्ट्याने देण्यास, यापुर्वीच मान्यता देण्यात आली आहे. या जमिनीचे नोंदणी व मुद्रांक विभागाने ठरवलेल्या किंमतीच्या सहा टक्के दरानुसार किंवा प्रतिवर्षी १ लाख २५ हजार प्रति हेक्टर यापेक्षा जी रक्कम जास्त असेल, त्या दराने वार्षिक भाडेपट्टा दर निश्चित करण्यात येईल.

२०२३ ते २४ आणि २०२८ ते २९ या कालावधीसाठी एकूण ७०० कोटी रुपयांच्या निधीस आणि त्यापैकी २०२३-२४ साठी २५ कोटी रुपये इतक्या निधीस हरित ऊर्जा निधीमधून खर्च करण्यास मान्यता देण्यात आली.

मंत्रिमंडळात घेतलेले निर्णय

• राज्यात केंद्राप्रमाणे दिव्यांग पदोन्नती आरक्षण धोरण लागू करणार. दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी ४ टक्के आरक्षण लागू.

• पुनर्जीवित किंवा पुनरर्चित साखर कारखाना, सूतगिरणीच्या कामकाजासाठी तात्पुरती समिती नेमणार. सहकारी संस्था अधिनियमात सुधारणा.

• महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) उपकंपनी स्थापणार. मागास, वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणार.

• राज्यातील अकृषि विद्यापीठामधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी.

• आता बी.एस्सी. पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीच्या आंतरवासिता विद्यार्थाना विद्यावेतन मिळणार.

• ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन पत्रासोबत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ.

•खुल्या गटातील महिलांकरता आरक्षण पदावरील निवडीकरता खुल्या व मागास प्रवर्गातील  महिलांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आवश्यक नाही.

• पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करणे व पदे निर्माण करण्यास मान्यता.

• अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास व आवश्यक पदनिर्मितीस मान्यता‌.

• पुणे पालिका हद्दीत निवासी मालमत्तांना दिलेली सवलत कायम तसेच दुरुस्तीपोटी फरकाची रक्कम वसूल न करण्याचा निर्णय.

• मराठी भाषा भवनाच्या सुधारित आराखड्याचे सादरीकरण. मंत्रिमंडळाची मान्यता.

Web Title: maharashtra government cabinet decisions A big decision for farmers in the cabinet meeting Now you will get electricity for agriculture even during the day, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.