कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 05:54 AM2020-06-09T05:54:34+5:302020-06-09T05:55:13+5:30

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची टीका

Maharashtra government fails to handle corona crisis | कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी

कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी

Next

नितीन अग्रवाल 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचे संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंह यांनी फटकारले असून कोविड-१९ चा फैलाव कसा रोखता येतो याची प्रेरणा उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील भाजप सरकारकडून घ्यावी, असा सल्लाही दिला. महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस चालू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

सोमवारी सिंह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्राला ‘जनसंवाद रॅलीत’ मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. राजनाथ सिंह यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीने हे दाखवून दिले आहे की, राज्य सरकार हे संकट हाताळण्यास असमर्थ ठरले आहे, असे म्हटले व आम्ही महाराष्ट्र सरकारला कोविड-१९ शी लढण्यासाठी सर्व ती मदत करण्यास तयार आहोत, असे आश्वासन दिले.
स्थलांतरित मजूर/कामगारांना त्यांच्या त्यांच्या राज्यांत घेऊन जाण्यासाठी आमच्या रेल्वे तयार होत्या. पण महाराष्ट्र सरकारने पुरेसे सहकार्य न केल्यामुळे त्यांची फरपट झाली, असे त्यांनी ठासून सांगितले.

अभिनेता सोनू सूद यांच्यावर टीका केल्याबद्दल महाविकास आघाडीवरही सिंह यांनी हल्ला केला. महाराष्ट्रात स्थलांतरितांना जे भोगावे लागले ते राज्य सरकारने पुरेसे सहकार्य न केल्यामुळे, असा ठपका त्यांनी ठेवला.

Web Title: Maharashtra government fails to handle corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.