Maharashtra Government : बहुमत होतं मग गुंडागर्दी करण्याची गरज काय?- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:46 AM2019-11-25T10:46:36+5:302019-11-25T10:48:16+5:30
अजित पवारांनी भाजपाबरोबर जात सरकार स्थापन केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
मुंबईः अजित पवारांनी भाजपाबरोबर जात सरकार स्थापन केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंही आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस आणि अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. 20 प्रमुख मंत्रालयं आणि अजित पवारांना अडीच वर्षं मुख्यमंत्र्यांची भाजपानं ऑफर देऊन आपल्याकडे वळवल्याची माहिती सूत्रांकडून मला मिळाली आहे.
मीडियाच्या माध्यमातून माझ्याकडे ही बातमी आली आहे. या राज्यात कशा प्रकारचं राजकारण चाललं आहे हे सर्वच पाहत आहेत. राज्यपालांना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते आमदारांच्या समर्थनाचं पत्र देणार आहेत. अजित पवारांबरोबर गेलेले सर्वच लोक परतले आहेत. गुरुग्रामच्या हॉटेलमधल्या ओबेरॉयमधील रुम नंबर 5117मध्ये ऑपरेशन सुरू होतं. शिवसेना-राष्ट्रवादीचे प्रमुख लोक तिथे पोहोचले होते, त्यांनीच त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे. महाराष्ट्रातलं मुख्यमंत्रिपद किंवा सत्ता मिळवण्यासाठी या देशातले राज्यकर्ते कोणत्या थराला जात आहेत. हे चित्र घृणास्पद आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: There are four people in 'Operation Kamal'; CBI, ED, Income Tax dept and Police carry out 'Operation Kamal'. But it will not yield any result here. If you have the majority then why do you need an 'Operation Kamal'? #Maharashtrahttps://t.co/KLZbqNncdx
— ANI (@ANI) November 25, 2019
तुमच्याकडे बहुमत होतं मग गुंडागर्दी करण्याची गरज काय?, राज्यपाल आणि राष्ट्रपतींची फसवणूक केली, यशवंतराव चव्हाण यांना जनता पक्षाचं सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रपतींनी सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यावेळी सर्वात मोठा पक्ष असतानाही त्यांनी सांगितलं होतं की सरकार स्थापन करा, त्यावेळी त्यांनी लोकशाही संकेताला धरून नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
Sanjay Raut, Shiv Sena: Today Shiv Sena-NCP-Congress will go to meet Governor. #Maharashtrapic.twitter.com/89nO9RR8Uy
— ANI (@ANI) November 25, 2019