मुंबईः अजित पवारांनी भाजपाबरोबर जात सरकार स्थापन केल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंही आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस आणि अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. 20 प्रमुख मंत्रालयं आणि अजित पवारांना अडीच वर्षं मुख्यमंत्र्यांची भाजपानं ऑफर देऊन आपल्याकडे वळवल्याची माहिती सूत्रांकडून मला मिळाली आहे.मीडियाच्या माध्यमातून माझ्याकडे ही बातमी आली आहे. या राज्यात कशा प्रकारचं राजकारण चाललं आहे हे सर्वच पाहत आहेत. राज्यपालांना काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रमुख नेते आमदारांच्या समर्थनाचं पत्र देणार आहेत. अजित पवारांबरोबर गेलेले सर्वच लोक परतले आहेत. गुरुग्रामच्या हॉटेलमधल्या ओबेरॉयमधील रुम नंबर 5117मध्ये ऑपरेशन सुरू होतं. शिवसेना-राष्ट्रवादीचे प्रमुख लोक तिथे पोहोचले होते, त्यांनीच त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे. महाराष्ट्रातलं मुख्यमंत्रिपद किंवा सत्ता मिळवण्यासाठी या देशातले राज्यकर्ते कोणत्या थराला जात आहेत. हे चित्र घृणास्पद आहे.
Maharashtra Government : बहुमत होतं मग गुंडागर्दी करण्याची गरज काय?- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:46 AM