Join us

अशोक चव्हाण यांचं 'ते' विधान चुकीचं - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 12:37 PM

विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकत असल्याने राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ठळक मुद्देविधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं.चव्हाण यांच्या या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकत असल्याने राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले

मुंबई - विधानसभेचे अधिवेशन २८ फेब्रुवारी रोजी संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील असं प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. चव्हाण यांच्या या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकत असल्याने राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार असल्याचे वक्तव्य केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच अशोक चव्हाण यांचं विधान चुकीचं असून राज्यातील सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. विधानसभा बरखास्त होणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

औरंगाबादमध्ये अशोक चव्हाण यांनी ‘लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. २८ फेब्रुवारी रोजी विधानसभेचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जातील, त्यादृष्टीने कामाला लागा. मतांचे विभाजन टाळा आणि भाजप- सेनेला पाडा,’ असे कळकळीचे आवाहन केले होते. तसेच चव्हाण यांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारवर चौफेर टीका देखील केली होती. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसअशोक चव्हाणकाँग्रेसभाजपानिवडणूकराजकारण