मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर, जखमींच्या उपचाराचा खर्च उचलणार महाराष्ट्र सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 02:20 PM2017-09-29T14:20:37+5:302017-09-29T15:01:51+5:30
एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर घडलेल्या चेंगरा चेंगरी घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
मुंबई - एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर घडलेल्या चेंगरा चेंगरीच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. आपल्याला या घटनेने धक्का बसला असून, या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्याचे मुख्यसचिव आणि पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा केली असून, त्यांना रुग्णालयात पोहोचण्याचे निर्देश आहेत.
या दुर्घटनेची महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून चौकशी केली जाईल तसेच जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करु असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार आहे.
My heart goes out to the families who lost their loved ones and got affected. #Elphinstone
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 29, 2017
My heart goes out to the families who lost their loved ones and got affected. #Elphinstone
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 29, 2017
Spoke to Chief Secretary and @CPMumbaiPolice ; asked them to reach hospital to monitor and ensure that everyone gets all the help.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 29, 2017
Enquiry will be conducted by Government of Maharashtra and Ministry of Railways and necessary, strict action will be taken.@RailMinIndia
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 29, 2017