मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; ‘तो’ काळही ग्राह्य धरला जाणार! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 03:40 PM2023-05-12T15:40:52+5:302023-05-12T15:42:56+5:30

Param Bir Singh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेले निलंबित पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

maharashtra govt drops all charges against former mumbai top cop param bir singh and revoked suspension order | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; ‘तो’ काळही ग्राह्य धरला जाणार! 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; ‘तो’ काळही ग्राह्य धरला जाणार! 

googlenewsNext

Param Bir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारचा हा मोठा निर्णय मानला जात आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केले होते. यानंतर परमबीर सिंह यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र, आता परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच परमबीर सिंह यांच्यावरील आरोपही मागे घेण्यात आले आहेत.

परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली होती. यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारने त्यांचे निलंबन मागे घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे-फडणवीस सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये जारी केलेले निलंबन आदेश रद्द केले आहेत. 

‘तो’ काळही ग्राह्य धरला जाणार

दिनांक ०२ डिसेंबर २०२१ रोजीचे आरोपपत्र अखिल भारतीय सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९६९ च्या नियम ८ अंतर्गत परमबीर सिंह यांचे निलंबन मागे घेतले जात आहे. हे प्रकरण बंद केले जात आहे, असे सरकारचे संयुक्त सचिव व्यंकटेश भट यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. याशिवाय, नियमांच्या तरतुदींनुसार, परमबीर सिंह यांचे निलंबन रद्द करण्यात येत असून, ०२ डिसेंबर २०२१ ते ३० जून २०२२ पर्यंतच्या निलंबनाचा कालावधी सर्व उद्देशांसाठी कर्तव्यावर असल्याचे मानले जाईल, असेही आदेशात म्हटले आहे. याचाच अर्थ सदर काळ सेवा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. 

दरम्यान, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करून महाविकास आघाडीला मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अडचणीत आणले होते. अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांना परमबीर सिंह यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. अनेक महिने ते अज्ञातवासात होते. ठाणे आणि नवी मुंबईतील पोलिसांत परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी आणि अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कांदिवली येथील कार्यालयात त्यांची चौकशी झाली होती. डिसेंबर २०२१ मध्ये परमबीर सिंह यांना पोलीस दलातून निलंबितही करण्यात आले होते.

 

Web Title: maharashtra govt drops all charges against former mumbai top cop param bir singh and revoked suspension order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.