"शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन अनाठायी; कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 04:48 PM2022-04-08T16:48:28+5:302022-04-08T16:50:25+5:30

शेकडोच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन केलं.

maharashtra home minister speaks about st workers sharad pawar silver oak strike said who did it is well known | "शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन अनाठायी; कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत"

"शरद पवारांच्या घराबाहेरील आंदोलन अनाठायी; कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत"

Next

मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन(ST Workers Strike) संपले असे वाटत असताना आज पुन्हा एकदा एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले. शेकडोच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन केलं. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेल करण्यात आली. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अचानक जे अनिष्ट वळण लागले ते अनुचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर झालेली निदर्शने अस्थानी व अनाठायी आहेत. कर्मचाऱ्यांच्या भावना भडकावणारे कोण हे सर्वश्रुत आहे," अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली.


कर्मचाऱ्यांकडून चप्पलफेक
यावेळी अनेक संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घराकडे चप्पलफेक आणि दगडफेक केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सुरुवातीला निवासस्थानातील सुरक्षा कर्मचारी आणि पोलिसांनी संपकरी कर्मचाऱ्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेकडोच्या जमावासमोर त्यांचा निभाव लागला नाही. यानंतर आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा सिल्वर ओकमध्ये दाखल झाला. या संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने महिलाही सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आपल्या हातील बांगड्या वाजवून सरकारचा निषेध केला.

Web Title: maharashtra home minister speaks about st workers sharad pawar silver oak strike said who did it is well known

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.