Join us

"संजय राऊत यांनी समस्त डॉक्टरांची माफी मागावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 7:18 PM

यांनी कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर आज प्राणाची बाजी लावून काम करताहेत. अशावेळी त्यांचे कौतुक करणे तर सोडाच पण राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कम्पाऊन्डरना जास्त कळतं असे म्हणणे निषेधार्ह आहे.

मुंबई - डॉक्टरांबद्दल अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समस्त डॉक्टर वर्गाची माफी मागावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने केली आहे. आयएमए कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या बैठकीत राऊत यांनी माफी मागावी या मागणीचा तसेच राऊत यांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.आयएमएच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी लोकमतला सांगितले की, एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनीडॉक्टरांबद्दल अपशब्द काढले. ''डॉक्टरपेक्षा कम्पाऊन्डरला जास्त कळतं'', ''मी तर नेहमी कम्पाऊन्डरकडून औषध घेतो'', ''डब्ल्यूएचओला काय कळतं, सीबीआयसारखंच आहे ते, इकडून तिकडून माणसं गोळा केलेली असतात, डब्ल्यूएचओच्या नादाला लागले म्हणून जास्त कोरोना वाढला'', अशी विधाने राऊत यांनी त्या मुलाखतीत केली होती.डॉ.भोंडवे यांनी सांगितले की राऊत यांनी कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर आज प्राणाची बाजी लावून काम करताहेत. अशावेळी त्यांचे कौतुक करणे तर सोडाच पण राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कम्पाऊन्डरना जास्त कळतं असे म्हणणे निषेधार्ह आहे. डब्ल्यूएचओवरही त्यांनी केलेली टीका अत्यंत अनाठायी आहे. राऊत यांनी देशभरातील डॉक्टरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे.त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याबाबत आम्ही विचार करीत आहोत. आयएमएच्या राज्यभरातील २१६ शाखांतर्फे राऊत यांच्या निषेधाचे ठराव मंजूरकरून ते राज्यपाल, मुख्यमंत्री आणि राज्यसभा सचिवालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही डॉ.भोंडवे यांनी दिली.

टॅग्स :संजय राऊतडॉक्टरवैद्यकीयमहाराष्ट्र