महाराष्ट्राला हुडहुडी…; गुरुवारपर्यंत राहणार लाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 07:34 IST2024-12-17T07:34:04+5:302024-12-17T07:34:59+5:30

थंडीची ही लाट येत्या गुरुवारपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

maharashtra is in a state of shock cold wave will remain till thursday | महाराष्ट्राला हुडहुडी…; गुरुवारपर्यंत राहणार लाट

महाराष्ट्राला हुडहुडी…; गुरुवारपर्यंत राहणार लाट

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी होत असून, तिकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमान अहिल्यानगर येथे ५.५ अंश अंश सेल्सिअस नोंदवले गेले. थंडीची ही लाट येत्या गुरुवारपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

विदर्भ आणि खान्देश कमालीचा गारठला आहे. मराठवाड्यातील बहुतेक शहरांचे किमान तापमान  १० अंशांपर्यंत होते. पश्चिम महाराष्ट्रही गारठला असून,  पुण्यात किमान तापमान ७ अंशांवर होते, तर एनडीए परिसरातील पारा ६ अंशांपर्यंत घसरला होता. महाबळेश्वरपेक्षाही साताऱ्यातील पारा घसरला होता.

जेऊर ५.०, अहिल्यानगर ५.५०, बारामती ७.३०, गोंदिया ७.४०, बीड ७.५०, नांदेड ७.६०, उदगीर ७.०, पुणे ७.८०, जळगाव ७.८०, परभणी ८.२०, नागपूर ८.४०, गडचिरोली ९.०, नाशिक ९.४०, धाराशिव ९.४०,  मालेगाव ९.६०, वाकोला ९.९०, भंडारा १०.०, जालना १०.२०, सातारा १०.४०, चंद्रपूर १०.४०, अमरावती १०.६०, बुलढाणा ११.४०, सोलापूर ११.५०, सांगली १२.७०, माथेरान १३.८०, महाबळेश्वर १३.५०, मुंबई १४.०, कोल्हापूर १४.१०, डहाणू १५.०, ठाणे १९.२०

 

Read in English

Web Title: maharashtra is in a state of shock cold wave will remain till thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.