Join us  

संत, समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 6:11 AM

सरकारकडून राजभवनात नागरी सत्कार

मुंबई : समानता व भक्तीचा संदेश देणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम यांसारखे संत, आत्मसन्मान व राष्ट्र गौरव वाढवणारे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य आहे. समाजाच्या शेवटच्या घटकासाठी कार्य करण्याची जाणीव राज्याकडून यापुढेही जपली जावी, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.

राष्ट्रपतिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच महाराष्ट्रात आलेल्या मुर्मू यांचा गुरुवारी सरकारतर्फे राजभवन येथे नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी  राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. राष्ट्रपतींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. 

राज्यपाल रमेश बैस यांनी मुर्मू यांसारखे साधे व निरलस व्यक्तिमत्त्व राष्ट्रपती म्हणून लाभणे, हे देशाचे भाग्य असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचे व्यक्तिमत्त्व शून्यातून विश्व निर्माण करणारे असल्याचे सांगितले. आदिवासी कुटुंबात जन्मलेली मुलगी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची राष्ट्रपती होणे हा भारताचा गौरव असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

टॅग्स :महाराष्ट्रद्रौपदी मुर्मू