महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला; शिंदे गटाचे खासदार अमित शाहांची घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 05:28 PM2022-12-06T17:28:17+5:302022-12-06T17:28:48+5:30
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा सुरू झाला आहे. आज कर्नाटकातील बेळगावमध्ये महाराष्ट्र राज्यातील वाहने अडवण्यात आली आहेत.
मुंबई- गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा सुरू झाला आहे. आज कर्नाटकातील बेळगावमध्ये महाराष्ट्र राज्यातील वाहने अडवण्यात आली आहेत, यावरुन आता पुन्हा एकदा वाद चिघळला आहे. या पार्श्वभूमिवर दिल्लीत शिंदे गटाच्या खासदारांनी गृहमंत्री अमित शाह यांची वेळ मागितली आहे. शाह यांची भेट घेऊन सीमावाद संदर्भात शिंदे गटाचे खासदार माहिती देणार आहेत.
संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार आहे, या पार्श्वभूमिवर आज एनडीएच्या खासदारांची बैठक झाली. यावेळी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते, बैठक संपल्यानंतर राहुल शेवाळे यांनी अमित शाह यांच्याकडे भटीसाठी वेळ मागितली आहे.
Sharad Pawar: २४ तासात हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल; शरद पवारांचा कर्नाटकला रोखठोक इशारा!
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर चर्चा करण्यासाठी ही वेळ मागितली आहे. या भेटीत शिंदे गटाचे खासदार कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर चर्चा करणार आहेत.
शरद पवारांचा कर्नाटकला रोखठोक इशारा!
गेल्या काही दिवसांपासून मी पाहातोय सीमावाद उफाळून आला आहे आणि याला वेगळं वळण देण्याचं काम केलं जात आहे. सीमावादावर आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे आणि स्थिती गंभीर झाली आहे. येत्या २४ तासांत हल्ले थांबले नाहीत तर आमचाही संयम सुटेल, असा रोखठोक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याचं दिसून येत आहे. बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. तसंच महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.