Join us

Sikander Sheikh : सिकंदर शेख - महेंद्र गायकवाड पुन्हा आमनेसामने उभे ठाकणार?; कुस्तीच्या आखाड्यातच वाद निकाली निघण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 1:08 PM

नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात पार पाडली. या स्पर्धेत सर्वच कुस्त्या जोरदार झाल्या. पण, या स्पर्धेत सेमिफानल कुस्तीवरुन नवा वाद सुरू झाला.

नुकतीच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात पार पाडली. या स्पर्धेत सर्वच कुस्त्या जोरदार झाल्या. पण, या स्पर्धेत सेमिफानल कुस्तीवरुन नवा वाद सुरू झाला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये पैलवान सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड असा सामना झाला. या सामन्यात सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याचा आरोप सोशल मीडियावर सुरू आहे. 

सोशल मीडियावर अनेक कुस्ती प्रेमींनी सिकंदर शेखवर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना स्वत: पैलवान सिकंदर शेख यानेही आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले आहे, त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्र केसरीतील त्या सामन्यावर आरोप सुरू आहेत.  

हरयाणाचे मल्ल ऑलिम्पिक गाजवताहेत, आपले पठ्ठे 'महाराष्ट्र केसरी'च्या 'आखाड्यात'च अडकलेत!  

या सामन्यावरुन सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. एका गटाने सिकंदर शेखवर अन्याय झाल्याचे म्हटले आहे, तर दुसऱ्या गटाने अन्याय झाला नसल्याचे म्हटले आहे. यावरुन आता सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला आहे. 

सेमिफायनलमध्ये सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली. या सामन्यात महेंद्र गायकवाड याला पंचांनी जादा गुण दिल्याचा आरोप सोशल मीडियावर सुरू आहे. या सामन्यात महेंद्र याने मारलेला टांग डाव बसला नसताना चार गुण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता या वादावर पडदा टाकण्यासाठी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात सांगलीत कुस्ती होणार आहे. ही कुस्ती घेण्यासाठी अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात बोलणी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

या कुस्त्यांचे आयोजन काही दिवसातच सांगलीत होणार असल्याचे बोलले जात आहे.   

टॅग्स :कुस्तीमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा