Join us

'छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे महाराष्ट्राला माहीत आहे, राऊतांना काय पुरावा हवाय?'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 5:24 PM

संजय राऊत यांनीच वाद संपवावा.

मुंबई: शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का? शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा असा सल्ला देणाऱ्या भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान संजय राऊत यांनी उदयनराजेंना दिले आहे. संजय राऊत यांच्या या विधानावर आता भाजपाचे नेते शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील उडी घेतली आहे.

संजय राऊत यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या विधानावर छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरावा द्यावा हे संजय राऊत यांनीच सांगाव असं शिवेंद्रराजे म्हणाले. तसेच मी किंवा उदयनराजे, संभाजीराजे काही बोललो नव्हतो. संजय राऊत यांनीच वाद सुरु केला होता. त्यामुळे आता संजय राऊत यांनीच वाद संपवावा असं शिवेंद्रराजेंनी सांगितले.

शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर 

आज पुण्यात सुरू असलेल्या लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी राऊत यांनी उदयनराजेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले की, ''उदयनराजे साताऱ्यात काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. या देशात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना बोलू द्या. ते माजी खासदार आहेत. भाजपाचे नेतेही आहेत. त्यामुळे ते विरोधी पक्षाची भूमिका मांडत आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा आदर करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येते तेव्हा आम्ही नतमस्तक होतो, असेही राऊत यांनी सांगितले. गणपती, विष्णू अशा दैवतांची पूजा करताना कुणी विचारायला जात नाही.  तसेच महापुरुषांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या वंशजांना विचारण्याची पद्धत नाही आहे. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असतील. तर त्यांनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे.''असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले. 

'आज के शिवाजी नरेंद्र मोदी'' या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेला टीकेचे अधिक लक्ष्य केले. ते म्हणाले की,'' मुंबईला असलेल्या शिवसेना भवनात बाळासाहेबांच्या फोटोखाली शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. यावर शिवसेनेने उत्तर दिले पाहिजे. शिवरायांचे वंशज म्हणून आमच्यावर टीका केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्ही पाळत आलो आहोत. सत्तेच्या मागे आम्ही कधी गेलो नाही. पण सोयीप्रमाणे राजकारण करायचं ही काही जणांची लायकी आहे. शिवसेनेकडून शिववडा नावाचा वडापाव सुरू करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचे नाव वडापावला देता ? आम्ही शिवसेना नावावर आम्ही कधी हरकत घेतली नाही. खरंतर शिवसेनेचे नाव बदलून ठाकरे सेना केले पाहिजे, असा टोलाही उदयनराजेंनी लगावला होता. 

शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा! उदयनराजेंचा खोचक सल्ला

टॅग्स :शिवेंद्रसिंहराजे भोसलेसंजय राऊतउदयनराजे भोसलेसंभाजी राजे छत्रपतीशिवसेनामहाराष्ट्र सरकारछत्रपती शिवाजी महाराज