देशात महाराष्ट्र लसीकरणात अव्वल
राजस्थानला टाकले मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासनाने लसीकरणाच्या मोहिमेला दिलेल्या व्यापक स्वरूपामुळे लसीकरणात महाराष्ट्र हा देशभरात अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्राने राजस्थानलाही मागे टाकले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ४५ हजार ८६० लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. तर राजस्थानमध्ये ५५ लाख ८२ हजार ८७२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
देशात महाराष्ट्र आणि राजस्थाननंतर गुजरात ५४ लाख ८२ हजार ५०, उत्तरप्रदेश ५३ लाख २८ हजार ४१९ आणि पश्चिम बंगालमध्ये ५० लाख ९१ हजार १०३ जणांनी कोरोनाची लस घेतली. देशात ३१ मार्चपर्यंत लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५ कोटी ३९ लाख ८९ हजार ३५ इतकी आहे; तर दुसरा डोस घेणारे ९० लाख ६५ हजार ३१८ आहेत. आतापर्यंत एकूण ६ कोटी ३० लाख ५४ हजार ३५३ जणांनी कोरोना लस घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.
राज्यात ३१ मार्च रोजी दिवसभरात २ लाख १६ हजार २११ जणांना लस देण्यात आली. त्यात १ लाख ९१ हजार ५७३ लाभार्थ्यांना कोविशिल्ड लस आणि २४ हजार ६३८ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
* इथे सर्वांत कमी लसीकरण
लक्षद्वीप - ६ हजार ९५९
दादरा नगर हवेली - १३ हजार १९७
दमण आणि दीव - १४ हजार ३४
अंदमान निकोबार २२ हजार ८८
लडाख - ४५ हजार ८१२
चंदीगढ ७५ हजार ९५३
अरुणाचल प्रदेश - ८५ हजार ९९८