Maharashtra Legislative Council : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 08:12 AM2018-05-21T08:12:41+5:302018-05-21T08:47:21+5:30
विधान परिषदेच्या अमरावती, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व नाशिक या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 6 जागांसाठी आज मतदान होत आहे.
मुंबई - विधान परिषदेच्या अमरावती, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व नाशिक या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 6 जागांसाठी आज मतदान होत आहे. 24 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
विधान परिषद निवडणूक 2018 : यांच्यात आहे लढत
- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी) विरुद्ध राजीव साबळे (शिवसेना)
- नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना) विरुद्ध शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी काँग्रेस)
- परभणी-हिंगोली : विप्लव बजोरिया (शिवसेना) विरुद्ध सुरेश देशमुख (काँग्रेस)
- उस्मानाबाद-लातूर-बीड : सुरेश धस (भाजपा) विरुद्ध अशोक जगदाळे (अपक्ष) - राष्ट्रवादीचा पाठिंबा
- अमरावती : प्रवीण पोटे (भाजपा) विरुद्ध अनिल मधोगरिया (काँग्रेस)
- वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : इंद्रकुमार सराफ (काँग्रेस) विरुद्ध रामदास अंबटकर (भाजपा)
(नाशिकमध्ये भाजपा राष्ट्रवादीच्या पाठीशी?)
दरम्यान, शिवसेनेचे अॅड. राजीव साबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. रायगड जिल्ह्यातील 231 स्त्री आणि 238 पुरुष असे एकूण 469 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पनवेल, कर्जत, पेण, अलिबाग रोहे, श्रीवर्धन, माणगाव आणि महाड येथील प्रांताधिकारी कार्यालयात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शेकाप, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे तटकरे यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
दरम्यान, पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने केलेल्या खेळीला चोख प्रत्युत्तर देत भाजपाने नाशिकमध्ये विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासंदर्भात भाजपाच्या अनधिकृत सूत्रांनी दुजोरा दिला आहे.