Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्यामुळे राज्य सरकार आज मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या संवादात मुख्यमंत्री कोणता निर्णय जाहीर करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
Pune Breaking : लॉकडाऊन टळला ; पण पीएमपी, हॉटेल, सिनेमागृह, मॉलबाबत कडक निर्बंध
कोरोनाच्या संदर्भात आज दिवसभर राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांच्या बैठका सुरू असून दुपारी साडेचार वाजता सह्याद्री अथितीगृहात मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांसोबत कोरोना आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर संध्याकाळी देखील मुख्यमंत्री उच्चस्तरीय बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधून कोरोना संदर्भात महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
“लोकांनी ऐकलं नाही तर मुंबईत कोरोनाचा स्फोट होईल; शेवटी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही”
राज्यात पुन्हा लॉकडाऊन?मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे राज्यावर पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार होती. याच संदर्भात आता मुख्यमंत्री अंतिम निर्णयापर्यंत आले असून आज लॉकडाऊन जाहीर केला जाणार का याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार नाही. फक्त निर्बंध आणखी कडक केले जातील असं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. पण रुग्णसंख्या तरीही आटोक्यात आली नाही तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. लोकांच्या जीवापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही, असंही ते म्हणाले होते.
पुण्यात अंशत: लॉकडाऊनपुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज कोरोना आढावा बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत पुण्यात अंशत: लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पुण्यात उद्यापासून संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. यात अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे.
नव्या नियमावलीनुसार ६ ते ६ पर्यंत शहरात पूर्णपणे बंद रेस्टॅारंट आणि बार पुर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. तसेच पीएमपी, मॅाल,, आठवडी बाजार हे ७ दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लग्न आणि अंत्यसंस्कार याशिवाय कोणत्याही सामाजिक , सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांना बंदी. लग्नाला ५० आणि अंत्यसंस्काराला उपस्थित राहु शकतात.