Uddhav Thackeray on Maharashtra Lockdown: राज्यात कडक निर्बंध लादणार, दोन दिवसांत नियमावली जाहीर करू; मुख्यमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 09:15 PM2021-04-02T21:15:40+5:302021-04-02T21:16:11+5:30
Maharashtra Lockdown CM Uddhav Thackeray says strict restrictions going to impose in state : येत्या दोन दिवसांत राज्यात कडक निर्बंध जाहीर केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे.
Maharashtra Lockdown: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना येत्या दोन दिवसांत राज्यात कडक निर्बंध जाहीर केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे. Maharashtra Lockdown CM Uddhav Thackeray says strict restrictions going to impose in state
"राज्यात संपूर्ण लॉकडाऊन आज जाहीर करत नाहीय. पण इशारा देतोय. कारण कोरोना रुग्णवाढीचा वेग असाच कायम राहिला तर लॉकडाऊनशिवाय पर्याय उरणार नाही", असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
लॉकडाऊन नको मग पर्याय सुचवा
"राज्यात आपण आरोग्य सुविधा वाढवत आहोत. आजच्या घडीला सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहेत आणि संख्या येत्याही काळात वाढवण्यात येणार आहे. पण आरोग्य सेवा वाढवा म्हणजे फक्त फर्निचर वाढवून चालत नाही. त्यासाठी लागणारे डॉक्टर, नर्सेस आणि तज्ज्ञ मंडळी कुठून आणणार?", असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला.
"कोरोनावर लस Corona Vaccineआली आणि ती आपण लोकांना देतही आहोत. पण लस घेतल्यानंतरही कोरोना होतोय. कोरोनावर उपचार पद्धती आणि आरोग्य सेवांबाबत सर्व प्रयत्न करत आहोत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनशिवाय इतर कोणता पर्याय आहे तुम्हीच सुचवा", असं सांगत उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांना टोला लगावला आहे.
राजकारण नको सहकार्य करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर विरोधकांनी केलेले आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी थेट वाचून दाखवले. लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांनी जरुर विरोध करावा आण रस्त्यावर उतरावं. पण कोरोनाच्या विरोधात रस्त्यावर उतरा, डॉक्टरांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरा. लोकांच्या जीवाशी खेळ करुन त्याचं राजकारण करू नका. मला कितीही व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला तरी मी माझं काम करतच राहणार, असं मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.