Maharashtra Lockdown : व्यायामशाळा, जॉगिंग आणि सायकलिंगला परवानगी घ्या, गोपाळ शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 07:22 PM2021-04-05T19:22:38+5:302021-04-05T19:23:03+5:30
Maharashtra Lockdown: व्यायामशाळा उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना एका पत्रकाद्वारे केली आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने 5 ते 30 एप्रिल पर्यंत अंशता लॉकडाउन लागू केला आहे. मात्र अधिकाऱ्यांनी गैरसमजातून मनोरंजन मैदान आणि व्यायामशाळेतील सर्व उपक्रम बंद करण्याचा लागू केलेला शासन आदेश व्यवहार्य नाही असे स्पष्ट मत उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे. (Maharashtra Lockdown: Permission for gym, jogging and cycling, Gopal Shetty demands to CM)
आज सामान्य लोक आधीच अनेक आरोग्य आणि मानसिक समस्यांशी झगडत आहेत आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याच्या दृष्टीने नागरिकांना करमणुकीच्या मैदानात जॉगिंग आणि सायकल चालविण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच व्यायामशाळा उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना एका पत्रकाद्वारे केली आहे.
नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या आणि आरोग्यासंबंधी सुधारित करण्याच्या मुख्य मुद्द्यावर योग्यपणे विचार करण्याची आणि करमणुकीच्या मैदानात जॉगिंग आणि सायकल चालविण्याची परवानगी देणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांना यामुळे प्राणवायू घेण्यास मदत होईल, आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती सुधारे. तसेच नागरिक कोविड -19 साथीच्या आजाराशी लढायला तंदुरुस्त रहातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.