गोराईतील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य, पीयूष गोयल यांचं आश्वासन

By रेश्मा शिवडेकर | Published: May 2, 2024 03:50 PM2024-05-02T15:50:57+5:302024-05-02T15:52:01+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: गोराईसह उत्तर मुंबईतील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य असेल. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीनुसार झोपड्यांचा पुनर्विकास करून रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन उत्तर मुंबईतील भाजप आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दिले.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Top priority to solve the problem of water scarcity in Gorai | गोराईतील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य, पीयूष गोयल यांचं आश्वासन

गोराईतील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य, पीयूष गोयल यांचं आश्वासन


मुंबई - गोराईसह उत्तर मुंबईतील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यास सर्वोच्च प्राधान्य असेल. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीनुसार झोपड्यांचा पुनर्विकास करून रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल, असे आश्वासन उत्तर मुंबईतील भाजप आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दिले.

मोदी यांनी राबवलेल्या अनेक योजनांमुळे जीवनमान किती बदलले आणि जनसामान्यांना किती दिलासा मिळाला हे त्यांनी सविस्तर मांडले. येत्या काही दिवसात बोरीवलीचा कायाकल्प होणार असल्याने मोदी यांना मतांच्या रूपाने भरभरून आशीर्वाद देण्याचे आवाहन गोयल यांनी नागरिकांना केले. बोरीवली (पश्चिम) येथील सिंधुदुर्ग भवन, सेक्टर ६, आरपीडी ७ ते गोराई येथील पेप्सी मैदान या मार्गावर या भव्य प्रचार फेरीचे आयोजन केले होते. नागरिकांनी त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.

जिथे रथ जाऊ शकणार नाही तिथे आमदार सुनील राणे यांच्यामागे स्कूटरवर बसले आणि त्यांनी वस्तीवस्तीत फिरून नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. 
या प्रचारफेरीत बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार, मनसे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Top priority to solve the problem of water scarcity in Gorai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.