Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : आधी विजयी घोषित, नंतर ४८ मतांनी पराभूत; अमोल कीर्तिकर यांचा चुरशीच्या सामन्यात निसटता पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 06:20 AM2024-06-05T06:20:57+5:302024-06-05T06:23:15+5:30

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : या मतदारसंघात दिवसभरात कधी रवींद्र वायकर आघाडीवर, तर कधी अमोल कीर्तिकर आघाडीवर असे चित्र होते.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: First declared winner, then lost by 48 votes; Amol Kirtikar narrowly lost in a tight match | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : आधी विजयी घोषित, नंतर ४८ मतांनी पराभूत; अमोल कीर्तिकर यांचा चुरशीच्या सामन्यात निसटता पराभव

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : आधी विजयी घोषित, नंतर ४८ मतांनी पराभूत; अमोल कीर्तिकर यांचा चुरशीच्या सामन्यात निसटता पराभव

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 :  मुंबई : राज्यातील काही मतदारसंघांत उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढवणारे निकाल पाहायला मिळाले. यात सर्वात चुरशीचा आणि काळजाचा ठोका चुकवणारा निकाल ठरला तो मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातील.

या मतदारसंघात दिवसभरात कधी रवींद्र वायकर आघाडीवर, तर कधी अमोल कीर्तिकर आघाडीवर असे चित्र होते. सायंकाळी शिवसेना नेत्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर येऊन अमोल यांचा २२०० मतांनी विजय झाल्याचे घोषित केले. याला विरोधी उमेदवार वायकर यांनी आक्षेप घेतला आणि फेर मतमोजणीची मागणी केली. त्यानंतर पुन्हा मतमोजणी पार पाडली.

या मतमोजणीत वायकर यांना अवघ्या ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. त्यावर अमोल कीर्तिकर यांनी बाद झालेल्या १११ टपाली मतदानावर आक्षेप घेऊन त्याची फेरतपासणी करण्याची मागणी केली.

सर्वांत कमी मताधिक्याने पराभव झाल्याने तणाव
फेर तपासणीत ही मते बादच असल्याचे निष्पन्न झाले आणि वायकर ४८ मतांनी विजयी झाले. या मतमोजणीवेळी दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण होते. सर्वांत कमी मताधिक्याने कीर्तिकर यांना पराभव पत्करावा लागला.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election Result 2024: First declared winner, then lost by 48 votes; Amol Kirtikar narrowly lost in a tight match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.