हिवाळ्यातही महाराष्ट्रात अधिकच्या पावसाची नोंद, १०० टक्के अतिरिक्त पाऊस पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 05:01 AM2019-12-03T05:01:59+5:302019-12-03T05:05:02+5:30

गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते.

In Maharashtra, the maximum rainfall was recorded in the winter, with an additional 8 percent rainfall | हिवाळ्यातही महाराष्ट्रात अधिकच्या पावसाची नोंद, १०० टक्के अतिरिक्त पाऊस पडला

हिवाळ्यातही महाराष्ट्रात अधिकच्या पावसाची नोंद, १०० टक्के अतिरिक्त पाऊस पडला

Next

मुंबई : सर्वसाधारणरीत्या आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात उत्तर-पूर्व मान्सून सक्रिय असतो आणि याचा परिणाम म्हणून पूर्व किनाऱ्यावरील तामिळनाडू, पाँडेचरी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळमध्ये पावसाची नोंद होते. प्रत्यक्षात मात्र या वर्षी १ आॅक्टोबर ते १ डिसेंबर या काळात पश्चिमेकडील राज्यांत अतिरिक्त पाऊस पडल्याची नोंद भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात या काळात १८३.१ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. सर्वसाधारणरीत्या या काळात महाराष्ट्रात सुमारे ९१.५ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद होते. म्हणजे यंदा १०० टक्के अधिक पाऊस पडला.
गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाडा व विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.

चक्रीवादळाची शक्यता
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होत आहे. परिणामी पुन्हा एकदा ४८ तासांत चक्रीवादळाची शक्यता आहे.

मुंबईत आकाश राहणार ढगाळ
३ आणि ४ डिसेंबर : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २५ अंशांच्या आसपास राहील.

अहमदनगर @ १० अंश सेल्सिअस
सोमवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १० अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे.

आज कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस
३ ते ४ डिसेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल.
५ ते ६ डिसेंबर : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Web Title: In Maharashtra, the maximum rainfall was recorded in the winter, with an additional 8 percent rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.