मुंबई - वाढदिवसाच्या पार्टीवरून घरी परतणाऱ्या कुटुंबासोबत भीषण दुर्घटना घडली. हे कुटुंब ४ वर्षाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून कारमधून घरी जात होते. तेव्हा अचानक मोठा स्फोट घडला. वाढदिवसाच्या पार्टीत शिल्लक राहिलेले फुगे कुटुंबातील काहींनी बूटस्पेसच्या जागी भरले. तेव्हा अचानक फुगे फुटायला लागले आणि कारमध्ये आग लागली. या घटनेत कुटुंबातील ३ जण गंभीर जखमी झाले.
मात्र या दुर्घटनेमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. फुगे फुगवणाऱ्याने हिलियमऐवजी हायट्रोजन गॅस भरला होता. त्यामुळे हा अपघात घडला. कारच्या आत गॅसने भरलेले फुगे फुटले आणि त्यामुळे आग लागली. या दुर्घटनेत ज्या ४ वर्षाच्या मुलाचा वाढदिवस होता त्याच्यासह ३ जखमी झाले. हे फुगे अत्यंत ज्वलनशील हायट्रोजन गॅसने भरलेले होते. विक्रेत्याने त्याबाबत कुटुंबाला काही सांगितले नाही. घरी जात असताना कारमध्ये अचानक स्फोट झाला आणि आग लागली.
महिलेने सांगितले की, फुगे आम्ही गाडीत भरलेले होते. आम्ही बिल्डिंगच्या जवळच पोहचलो होतो. तेव्हा अचानक कारमधील फुगे फुटू लागले. त्यानंतर आग लागली. धूर पसरला. फुग्यामुळे इतका मोठा अपघात घडू शकतो हे कुणालाच माहिती नव्हतं. मात्र या कुटुंबाने फुगे विकणाऱ्या दुकानदाराला घटनेसाठी जबाबदार धरलं आहे. फुगे विकणाऱ्याने हिलियमऐवजी हायट्रोजनचा वापर केला याची माहिती द्यायला हवी होती असं कुटुंबाने म्हटलं.