मनसेनं सुरू केली नवी वेब सीरिज; 'पेंग्विन गेम्स'

By जयदीप दाभोळकर | Published: January 11, 2021 11:33 AM2021-01-11T11:33:42+5:302021-01-11T11:34:19+5:30

या द्वारे सामान्यांना भेडसावणारे प्रश्न मांडण्याचा करण्यात येतोय प्रयत्न

maharashtra navanirman sena launches new web series Penguin Games | मनसेनं सुरू केली नवी वेब सीरिज; 'पेंग्विन गेम्स'

मनसेनं सुरू केली नवी वेब सीरिज; 'पेंग्विन गेम्स'

googlenewsNext
ठळक मुद्देमनसेकडून सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न

सध्या वेबसीरिजचा जमाना आहे. त्यातच वेब सीरिजद्वारे अनेक विषय सर्वांसमोर मांडण्याचे प्रयत्न केले जातात. पण आता राजकीय क्षेत्रही यापासून दूर राहिलेलं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक नवी वेब सीरिज लाँच केली आहे. 'पेंग्विन गेम्स' या नावाखाली त्यांनी एका वेब सीरिजला सुरूवात केली आहे. या वेब सीरिजद्वारे मनसेनंवरळीतील सामान्य नागरिकांना ज्या प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

"फेसबुकवर सुरू करण्यात आलेल्या या वेब सीरिजच्या पहिल्या भागात वरळी भागात असलेल्या प्रेम नगर येथील पाणी प्रश्न आणि सॅनिटायझेनची बिकट अवस्था मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्थानिक आमदार आणि सत्ताधारी पक्ष हे केवळ वरवरच्या मुद्द्यांवरच लक्ष देत असल्याचं दिसून येत आहे," असं मत मनसेचे संतोष धुरी यांनी व्यक्त केलं. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

एकीकडे शिवसेनेकडून वरळीमध्ये A+ कॅम्पेन चालवलं जात आहे. स्ट्रीट आर्ट, एलईडी सिग्नल, रस्त्यांचं सौदर्यीकरण अशा काही गोष्टी या ठिकाणी राबवल्या जात आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सामान्यांच्या समस्या मांडण्यासाठी पेंग्विन गेम्स ही वेब सीरिज सुरू केली आहे. "दर पंधरा दिवसांनी या वेब सीरिजचा एक भाग प्रदर्शित केला जाणार आहे. याचं प्रसारण सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जाईल. प्रेम नगरच्या रहिवाशांकडून आम्हाला उत्तम प्रतिसादही मिळाला आहे. शौचलांना दरवाजे नसणं, पाणी प्रश्न असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत," असं धुरी म्हणाले. २०१९ मध्ये राज्यात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये या ठिकाणाहून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना विजय मिळाला होता.

Web Title: maharashtra navanirman sena launches new web series Penguin Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.