Join us

तीन वर्षांत महाराष्ट्राने भरला १२ लाख कोटींचा आयकर; यादीत अन्य कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 5:55 AM

एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरकारी खजिन्यात योगदान देणारे महाराष्ट्र हे देशातील अव्वल क्रमांकाचे राज्य ठरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आयकराच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीत गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्राने तब्बल १२ लाख कोटी रुपयांचा भरणा केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरकारी खजिन्यात योगदान देणारे महाराष्ट्र हे देशातील अव्वल क्रमांकाचे राज्य ठरले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सन २०१९-२० या वर्षामध्ये ३ लाख ८४ हजार २५८ कोटी रुपये, सन २०२०-२१ या वर्षामध्ये ३ लाख ३१ हजार ९६९ कोटी रुपये तर सन २०२१-२२ या वर्षामध्ये ५ लाख २४ हजार ४९८ कोटी रुपये महाराष्ट्रातील जनतेने आयकराच्या माध्यमातून भरले आहेत.  

तीन वर्षांत महाराष्ट्राने एकूण १२ लाख ४० हजार ७२५ कोटी रुपये आयकरापोटी भरले आहेत. २०१९ ते २०२१ या दोन वर्षांमध्ये कोरोनाचे सावट असल्यामुळे कर संकलनात घट झाल्याचे दिसून येते. कोरोना काळ संपल्यानंतर पुन्हा अर्थचक्र सुरळीत झाल्यानंतर पुन्हा एकदा उत्पन्न आणि पर्यायाने कर भरणाही वाढल्याचे दिसून येते. देशात अव्वल, सर्वाधिक करभरणा सन २०२१-२२ मध्ये

यादीत अन्य कोण?

नवी दिल्ली कितव्या क्रमांकावर : दुसऱ्याकिती कर भरला : ४ लाख ४७ हजार कोटी रुपये

कर्नाटक कितव्या क्रमांकावर : तिसऱ्याकिती कर भरला : ३ लाख ९३ हजार ९०६ कोटी रुपये 

तामिळनाडूकितव्या क्रमांकावर : चौथ्याकिती कर भरला : २ लाख १९ हजार ३७० कोटी

गुजरातकितव्या क्रमांकावर : पाचव्याकिती कर भरला : १ लाख ६८ हजार ०२४ कोटी

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :इन्कम टॅक्समहाराष्ट्र