महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक उंचावू - नगराळे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 07:02 AM2021-01-08T07:02:42+5:302021-01-08T07:02:56+5:30

जायसवाल यांच्याकडून पदभार घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने या पदावर आपली निवड केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

Maharashtra Police Force | महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक उंचावू - नगराळे

महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक उंचावू - नगराळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील एक सर्वोत्कृष्ट दल आहे. सर्व अधिकारी व अंमलदारांसमवेत एकजुटीने काम करीत हा लौकिक आणखी उंचावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी गुरुवारी दिली.


जायसवाल यांच्याकडून पदभार घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्य सरकारने या पदावर आपली निवड केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. राज्यापुढे अनेक आव्हाने आहेत. कायदा व सुव्यवस्था कायम राखताना नक्षलवाद, दहशतवादाचा बीमोड करावयाचा आहे, सर्व घटकांना सोबत घेऊन आपण प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडू, महिला व बालकांवरील अत्याचारांचे गुन्हे कमी करणे तसेच पोलिसांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.


राज्य सरकारबद्दल नाराजी नाही - जायसवाल
गेले २३ महिने आपण राज्यात समाधानपूर्वक काम केले आहे. या कालावधीत अनेक महत्त्वाच्या घटना सुरळीतपणे पार पडल्या आहेत. आपल्याला केंद्रात आणखी महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची असल्याने प्रतिनियुक्तीवर जात आहे. राज्य सरकारबद्दल आपली कसलीही नाराजी नाही, असे सुबोध जायसवाल यांनी सांगितले. या वेळी त्यांनी पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांचे अनेक वेळा आभार मानले. मात्र त्यामध्ये एकदाही सरकारचा उल्लेख केला नाही.

Web Title: Maharashtra Police Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस