अण्णा नाईक परत येतायत, पण महाराष्ट्र पोलीस म्हणतात "मास्क वापरतास ना?"; हटके ट्विटची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 12:52 PM2021-03-22T12:52:53+5:302021-03-22T12:53:34+5:30

Maharashtra Police Tweet Over Anna Naik Returns: महाराष्ट्र पोलिसांनी केलेलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

maharashtra police tweet on mask about anna naik returns goes viral on social media | अण्णा नाईक परत येतायत, पण महाराष्ट्र पोलीस म्हणतात "मास्क वापरतास ना?"; हटके ट्विटची चर्चा

अण्णा नाईक परत येतायत, पण महाराष्ट्र पोलीस म्हणतात "मास्क वापरतास ना?"; हटके ट्विटची चर्चा

googlenewsNext

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. प्रशासनाकडून वेळोवेळी मास्क वापरण्याचं आवाहन देखील केलं जात आहे. त्यात मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसही नागरिकांना विविध पद्धतीनं मास्क वापरण्याचं महत्व पटवून देत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी केलेलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Maharashtra Police Tweet On Mask About Anna Naik Returns Goes Viral On Social Media)

'झी मराठी' टेलिव्हिजन वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका 'रात्रीस खेळ चाले'चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यासाठी 'अण्णा नाईक परत येणार' अशी जोरदार जाहीरात देखील सुरू आहे. याचाच आधार घेत महाराष्ट्र पोलिसांनी हटके ट्विट केलं आहे. 

मालिकेतील अण्णा नाईक या पात्राला मास्क लावून पोलिसांनी "मास्क वापरतास ना?" असं मालवणी भाषेतील कॅप्शन वापरुन लोकांना कोरोनाबाबतची जागरुक करण्याचं काम केलं आहे. "मास्क लावणे, अंतर राखणे, हात स्वच्छ करणे- 'तीन' गोष्टी लक्षात ठेवूया, कोरोनाचा 'खेळ' संपवूया!", असं म्हणत महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या भन्नाट ट्विटची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. 

राज्यात कोरोनाचा कहर
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात रविवारी तब्बल ३० हजार ५३५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. चिंतेची बाब म्हणजे गेल्या फक्त चार दिवसात महाराष्ट्रात १ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत कोरोनाचा विस्फोट सुरूच असून रविवारी एकट्या तब्बल ३७७५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. 
 

Web Title: maharashtra police tweet on mask about anna naik returns goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.