महाराष्ट्र पोलिसांतर्फे मुंबईत ९ फेब्रुवारीेला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 09:29 PM2020-01-15T21:29:08+5:302020-01-15T21:29:32+5:30

गेटवे ते वरळी सिंक मार्गावर पोलिसांची दौड !

Maharashtra police will organise international marathon in Mumbai on February 9 | महाराष्ट्र पोलिसांतर्फे मुंबईत ९ फेब्रुवारीेला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

महाराष्ट्र पोलिसांतर्फे मुंबईत ९ फेब्रुवारीेला आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन

Next

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातर्फे येत्या ९ फेब्रुवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. गेटवे आॅफ इंडिया ते वरळी सिंक मार्गापर्यत होणारी मॅरेथॉनचे पहिल्यादाच देशात पोलिसांमार्फत होत आहे. या वेबसाईटचे उदघाटन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.


पोलीस आणि जनतेमध्ये जवळीक वाढावी, त्यांच्यामध्ये संवाद वाढावा यादृष्टीने या मॅरेथॉनचे आयोजिली असून आॅनलाईन नोंदणी करुन नागरिकांनी लोकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गेट वे आॅफ इंडिया ते वांद्रे सी लिंक अशी ही मॅरेथॉन असेल. स्वास्थ्यदायी दौड अशी या मॅरेथॉनची संकल्पना आहे. ही मॅरेथॉन ४२ किलोमीटर, एकवीस किलोमीटर, १० मैल व ५ किलोमीटर या प्रकारांमध्ये होणार आहे. धावपटूंना आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. या मॅरेथॉनमध्ये भारतभरातून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुमारे १५ हजार धावपटू सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. मॅरेथॉनमध्ये ५ हजार पोलीस सहभागी होणार असल्याची माहिती .विशेष पोलीस महानिरीक्षक ( प्रशासन) कृष्ण प्रकाश यांनी दिली.


मॅरेथॉनसंदर्भात जनजागृती करण्यासाठी २ फेब्रुवारीला १८ वर्षांवरील ३०० सायकलपटूंच्या सहभागाने पनवेल, कल्याण, मीराभाईंदर येथून कुलाबा येथील पोलिस मुख्यालयापर्यंत सायकलफेरी काढण्यात येणार आहे. तसेच ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ वाजता महिलांची शक्ती आणि सुरक्षीतता याचा संदेश देत महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये महिला दौडचेही आयोजन करण्यात येणार आहे.
स्वस्थ पोलीस, सशक्त पोलिस, सक्षम पोलिस, सुदृढ पोलीस या दृष्टीने मॅरेथोनचे आयोजन करण्यात आले असून यातून जनतेला निरोगी आरोग्यासाठी मॅरेथॉनचे महत्व पटवून देता येणार आहे, असे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यावेळी म्हणाले.


पोलिस आणि जनतेमध्ये संवाद वाढावा, तरुणांच्या ऊजेर्चा विधायक कामासाठी सकारात्मक उपयोग व्हावा, राष्ट्रनिमार्णात तरुणांना अधिकाधिक सहभागी करून घेता यावे व त्यादवारे समाजात एकता, सौहार्द वाढावे हे या मॅरेथॉनमागचे उद्दिष्ट आहे, असे कृष्णप्रकाश म्हणाले.
मॅरेथॉन पूर्वी तंदुरुस्तीचे व्यायाम, सराव वा क्रीडाप्रकार करताना कुणालाही इजा, दुखापत होऊ नये, यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी देशभरातील २ हजार फिजिओथेरपिस्ट तसेच ३०० होमिओपॅथीस्ट, आहारतज्ज्ञ यांची सेवा मॅरेथॉनमधील सहभागीना उपलब्ध करून दिली आहे.पोलीस मुख्यालयात मॅरेथॉनसंदभार्तील जनजागृती मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस महासंचालक प्रशासक संजीव सिंघल, अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला, अलाईड डिजीटलच्या संचालक शुभदा जहागिरदार आदी उपस्थित होते.

 

Web Title: Maharashtra police will organise international marathon in Mumbai on February 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.