देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा; 'सागर' बंगल्यावर ठरली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 03:47 PM2022-06-30T15:47:17+5:302022-06-30T15:50:59+5:30

याठिकाणी देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Political Crisis: Discussion between Devendra Fadnavis and Eknath Shinde; The strategy was decided on 'Sagar' bungalow | देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा; 'सागर' बंगल्यावर ठरली रणनीती

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा; 'सागर' बंगल्यावर ठरली रणनीती

googlenewsNext

मुंबई - गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले. गोव्याहून सकाळी चार्टर्ड प्लेनने शिंदे मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे काही नेते पोहचले होते. विमानतळावर भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होताच थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहचले. 

याठिकाणी देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांचे स्वागत भाजपा नेत्यांनी केले. सागर बंगल्यावर पुढील रणनीती ठरवण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा पार पडली. त्यानंतर भाजपा नेत्यांसह एकनात शिंदे हे राजभवनाच्या दिशेने रवाना झाले. 

फडणवीस-शिंदे आजच घेणार शपथ
राज्यात भाजपा-शिंदे गट एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. एकनाथ शिंदे हे सकाळी गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर भाजपा नेत्यांची चर्चा करून ते राजभवनात पोहचले. संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे शपथ घेणार असल्याची माहिती आहे. आजच्या शपथविधीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात असं बोललं जात आहे. त्याआधी मुंबईत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला प्रभारी सी.टी रवी उपस्थित होते. याच बैठकीत दिल्लीहून शपथविधी सोहळा पार पाडण्यास ग्रीन सिग्नल देण्यात आल्याची माहिती आहे. 

ज्यांना मोठे केले तेच विसरले - उद्धव ठाकरे
सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीचा राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवल्यानंतर जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मी आलोच अनपेक्षितपणे. जातो पण तसाच आहे. मी पुन्हा येईन, म्हणालो नव्हतो, असे सांगतानाच उद्धव यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर आगपाखड केली. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तरी मला लाजिरवाणे आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करतोय अशी घोषणा त्यांनी केली. 

Web Title: Maharashtra Political Crisis: Discussion between Devendra Fadnavis and Eknath Shinde; The strategy was decided on 'Sagar' bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.