Join us  

सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 3:23 PM

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

मुंबई- रविवारी अचानक राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार यांच्यासह ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे, राष्ट्रवादीतील ३० आमदारांचा या शपथविधीला पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) मोठा गोंधळ सुरू असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सरकारमध्ये बैठकीला जाण्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके यांनी केला. 

'मी आता पवार...; अजित पवारांची भेट घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंची पहिली प्रतिक्रीया

यामुळे आता राष्ट्रवादीत उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या शपथविधीला खासदार शरद पवार यांचा विरोध असल्याचे पवारांनी सांगितले आहे, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे बैठकील उपस्थित होत्या असा दावा करण्यात आला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे. 

एका वृत्तवाहिनेला दिलेल्या प्रतिक्रीयेत आमदार सुनिल शेळके यांनी हा दावा केला आहे. आमदार शेळके म्हणाले, सत्तेत जाण्याअगोदर एक बैठक झाली.  या बैठकीतच भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं, या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यामुळे आम्हाला खासदार शरद पवार यांना सत्तेत जाण्यासंदर्भात विचाराव असं वाटलं नाही, असा मोठा गौप्यस्फोट आमदार शेळके यांनी केला. (Maharashtra Political Crisis)

रविवारी दुपारी अजित पवारांसह  (Ajit Pawar) राष्ट्रवादीतील ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, धर्मरावबाबा अत्राम  या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याची चर्चा सुरू झाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कारवाईचा इशारा दिला.   काल अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील या घडामोडीत पक्षाचे चिन्ह आणि नावावर दावा केला आहे. त्यानंतर प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करावे असे पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षअजित पवारशरद पवारसुप्रिया सुळे