Join us  

“कभी कभी लगता हैं अपुनीच भगवान है!” निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 7:41 AM

इंटरनेटच्या जगात गुरुवारी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची खमंग चर्चा सुरू होती.

इंटरनेटच्या जगात गुरुवारी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची खमंग चर्चा सुरू होती. संपूर्ण दिवस शिंदे की ठाकरे यावरच संपला. न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सोपविल्यामुळे नार्वेकरांच्या फोटोसह “कभी कभी लगता हैं अपुनीच भगवान है!” हा फिल्मी डायलॉग लिहिलेले मीम लक्षवेधी ठरले, तर ताशेरे ओढूनही निकाल विरोधात गेल्यामुळे गोंधळलेले मविआ कार्यकर्ते निकाल समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत हे दाखवण्यासाठी वापरलेले ‘जेठालाल’चे मीमदेखील मजेशीर ठरले. नेटकऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना... 

अखेर भरत गोगावलेंना मिळणार तरी काय? पक्षप्रतोद पदही गेल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय

निकाल तात्पर्य 

“कितीही कठीण परिस्थिती आली तरी मैदान सोडायचे नाही. निधड्या छातीने परिस्थितीचा सामना करायचा. राजीनामा देण्याआधी दहादा विचार करावा”

आजचा निकाल

मुलगी बघण्याचा कार्यक्रम बेकायदेशीर.एकमेकांची पसंती बेकायदेशीर.साखरपुडा बेकायदेशीर.लग्न बेकायदेशीर.हनिमून बेकायदेशीर.पण झालेलं बाळ मात्र कायदेशीर.....राजीनामा देण्याचा सल्ला देणाऱ्या व्यक्तीचा शोध उबाठा गटाचे लोकं घेत आहेत.लग्न लावण्याचा निर्णय योग्य नव्हता

▪️पुजारी अयोग्य होता▪️मंत्र चुकीचे होते▪️फेरे मारले ते योग्य होते▪️लग्न तूर्त कायम▪️नवरा-नवरी एकमेकांना अनुरूप आहेत का याचा निर्णय पुजारी घेईलवरील परिस्थितीचा आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा संबंध नाही. असल्यास योगायोग समजावाइमारत पूर्णतः बेकायदा आहे, मालक बेकायदा आहे, आर्किटेक्ट बेकायदा, बांधणाऱ्यांनी ते बेकायदा बांधलंय...पण, ती इमारत पाडायची की नाही ते बांधणारेच ठरवतील!

- सर्वोच्च निवाडा कोर्टाचा निकाल 

शिंदे यांनी ठाकरेंना नोबॉल टाकला. फडणवीसांनी अंपायरकडे खोटी अपील केली. अंपायर कोश्यारी यांनी चुकीचा निर्णय देत आऊट दिले आणि अशाप्रकारे नोबॉलवर ठाकरेंची विकेट घेतली. पण थर्ड अंपायरचा निर्णय येईपर्यंत ठाकरे मैदान सोडून मातोश्रींकडे जाऊन बसले. “त्यामुळे आता त्यांना परत बॅटिंगला बोलवता येणार नाही. ते मैदानावरच असते, तर त्यांना परत बॅटिंग करायला लावली असती. आता उरलेली मॅच कंटिन्यू करा,” असं थर्ड अंपायर म्हणतोय.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल