Join us  

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच, त्या पक्षाने फूट पडल्याचे सांगितले नाही', विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 7:17 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. यावरुन आता दोन्हीकडून राष्ट्रवादीवर दावा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रीया दिली. नार्वेकर म्हणाले, माझ्याकडे दोन्ही गटांचे अर्ज आले असून त्यावर लवकरच निर्णय घेऊ. 

केंद्रीय मंत्र्यांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी, भाजपने निवडणुकांसाठी आखली रणनिती

नार्वेकर म्हणाले,  आम्हाला काल दोन अर्ज मिळाले आहेत. अगोदर आमच्या कार्यालयाचे सचिव याबाबत चौकशी करतील, त्यानंतर प्रकरण आमच्याकडे येईल, त्यानंतर आम्ही या प्रकरणाचा विचार करून निर्णय घेऊ.

हा निर्णय घेण्याची मला घाई करायची नाही, निर्णय घेण्यास मला उशीर करायचा नाही, पण घाईगडबडीत कोणत्याही पक्षावर अन्याय होऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षात फूट पडली असा अर्ज मला कोणत्याही गटाने दिलेला नाही, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे मी अजूनही एकाच गटाच्या दृष्टिकोनातून पाहतो आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते कोण होणार किंवा व्हीप कोण असेल हे ठरवायचे आहे, असंही नार्वेकर म्हणाले. 

यासोबतच अनेक अर्ज आमच्याकडे आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आजपर्यंत अपात्रतेबाबतची याचिका माझ्याकडे आलेली नाही कारण त्याची प्रक्रिया मोठी आहे.ती अगोदर विधिमंडळ सचिवालयात जाते आणि त्यानंतर ही याचिका माझ्याकडे येते. रात्री एक वाजता हा अर्ज माझ्याकडे आला असून माझ्याकडे अजून अर्ज आले आहेत. ते वाचायला वेळ लागेल. यातील एक अपात्रतेबाबतही आहे. आमचा विभाग आता ते सर्व वाचेल. यानंतर निर्णय घेतला जाईल. जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेते बनवण्याबाबत अर्ज आला असून त्यावर काही नियमांनुसार निर्णय घ्यावा लागेल, असंही नार्वेकर म्हणाले. 

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाराहुल नार्वेकर