Join us

Chhagan Bhujbal- देशामध्ये मोदीच येणार, चार दिवसांपूर्वीच शरद पवारांनी आम्हाला सांगितले; भुजबळांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 4:22 PM

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.  

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमधील ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.  अजित पवार यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांपैकी ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.  यानंतर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीया दिली. यावेळी त्यांनी देशामध्ये मोदीच येणार, चार दिवसांपूर्वीच शरद पवारांनी आम्हाला सांगितले, असा मोठा गौप्यस्फोट केला.  (Maharashtra Political Crisis)

... म्हणून आम्ही सत्तेत आलो; अजित पवारांनी राष्ट्रवादीबाबत भूमिका केली स्पष्ट

छगन भुजबळ Chhagan Bhujbal म्हणाले, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच आम्ही सत्तेत सामील झालो आहोत. अनेक दिवस झाले यावर चर्चा सुरू होती. राज्यातील विकास कामे करायची असतील तर एकत्र येऊन कामे केली पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात मजबुतीने काम करत आहेत. ते विकासाच्या कामात ताबडतोब निर्णय घेतात. ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत हे सोडवायची असतील तर एकत्र येऊनच सोडवता येणार आहेत. पाटणामध्ये काही दिवसापूर्वी विरोधी पक्षांची मिटींग झाली. ते सर्व एकत्र येत नाहीत. देशात २०२४ मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत असं आम्हाला शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं आहे, असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं. 

आता जर २०२४ मध्ये मोदीच पंतप्रधान होणार आहेत, तर आपण सकारात्मकता घेऊनच काम केलं पाहिजे. लोक आमच्यावर आरोप करतात यांच्यावर केसेस आहेत म्हणून हे भाजप बरोबर गेले. आता तुम्ही बघा अजतदादा यांची केस नील झाली, माझ्यावर जी केस होती तीही सुटली. आदिती तटकरे, अनिल पाटलांच्यावर केस नाही, धर्मराजबाबा यांच्यावरही केस नाही. त्यामुळे आमच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न करु नये, असंही छगन भुजबळ म्हणाले. 

अजित पवारांनी राष्ट्रवादीबाबत भूमिका केली स्पष्ट

विकासाला महत्त्व दिलं पाहिजे असं मत माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं झालं. त्यातच, गेल्या ९ वर्षात नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने देशाला पुढे नेण्याचं काम केलंय, ज्याप्रमाणे विकासाचं काम केलंय, ते पाहता त्यांच्यासोबत जायला हवं, असं आमचं मत आहे. देशाच्या राजकारणात आज सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊन नरेंद्र मोदींना विरोध केला आहे. त्यामुळेच, ही राजकीय परिस्थिती पाहता, आम्ही मोदींसमवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच या सत्तेत, सरकारमध्ये सहभागी झालो आहे. यापुढील निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार यांनी आज शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आला आणि मी तो स्वीकारला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांसोबत ४० आमदार होते. तर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे की अजित पवार यांच्या गटाचा अशी चर्चा रंगली आहे. अजित पवारांच्या शपथविधीला नुकतीच पक्षाची मोठी जबाबदारी मिळालेले आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटलेही उपस्थित होते. त्यामुळे, आता शरद पवार काय भूमिका घेतात, हेही पाहायचं आहे. मात्र, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच सत्तेसत सहभागी झालो आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. (Maharashtra Political Crisis)

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारछगन भुजबळ