Maharashtra Political Crisis: 'पक्षाचा व्हिप आपल्या आमदारांना लागू होणार नाही कारण...'; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 03:53 PM2023-02-20T15:53:51+5:302023-02-20T15:56:06+5:30
Maharashtra Political Crisis: केंद्रीय निवडणूक आयोगाना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. यामुळे आता ठाकरे गटातील आमदारांना पक्षाचा व्हिप लागू होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई- केंद्रीय निवडणूक आयोगाना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. यामुळे आता ठाकरे गटातील आमदारांना पक्षाचा व्हिप लागू होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनीही सर्व आमदारांना व्हिप लागू होणार अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला पक्षाचा व्हिप लागू होणार नसल्याचे सांगितले आहे.
'शिवसेनेचा व्हिप आपल्या आमदारांना लागू होणार नाही, कारण निवडणूक आयोगाने याअगोदर दोन गट मान्य केले आहेत. त्यामुळे पक्षाचा व्हिप लागू होत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे; उद्धव ठाकरेंची मागणी
दसरा मेळावा आणि बीकेसीतील सभेवरुन समजले शिवसेना कोणाची आहे. तुमच्यात हिंमत असेलतर स्वत:च्या वडिलांचे नाव वापरुन निवडणुका लढवून दाखवा, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे
'निवडणूक आयोगाने आम्हाला जी कागदपत्र सांगितली ती आम्ही त्यांना दिली. त्यांनी सदस्य संख्या सांगितली ती सर्व दिली. पहिल्यांदा एक निकष लावला, पुन्हा सदस्य संख्येचा निकष लावला. तुम्हाला हाच निकष लावायचा होता तर आम्हाला प्रतिज्ञा पत्र का द्यायला लावली, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
'आम्ही कार्यकारणीची झालेल्या सभेची सीडी दिली. यात आयोग म्हटले कव्हरींग लेटर दिलेलं नाही. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय आम्हाला मान्य नाही, निवडणुकी पद्धतीने आयोग नेमला पाहिजे. आताच निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.