अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रीया; व्हिडीओ ट्विट करत म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 07:44 PM2023-07-02T19:44:19+5:302023-07-02T19:46:33+5:30

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.

Maharashtra Political Crisis Supriya Sule's first reaction after Ajit Pawar's rebellion; Tweeting the video | अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रीया; व्हिडीओ ट्विट करत म्हणाल्या...

अजित पवारांच्या बंडखोरीनंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रीया; व्हिडीओ ट्विट करत म्हणाल्या...

googlenewsNext

मुंबई- अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेनंतर आता  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे समोर आले आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. 

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडीओ ट्विट केला. हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आहे. यात शरद पवार  यांना तुमच्यासाठी आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न विचारला, यावेळी पवार यांनी शरद पवार हे नाव घेताच टाळ्या सुरू झाल्याचे दिसत आहे. हा ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी या पोस्टला ' ‘प्रेरणास्थान (Inspiration)' अशी कॅप्शन दिली आहे. या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.  

शरद पवारांनी दिला इशारा

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडल्याचे बोलले जात आहे, दरम्यान या सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात होते, आता शरद पवार यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. खासदार सुनिल तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई कारवाई करावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला. 

शरद पवार म्हणाले, पक्षाच्या धोरणाशी विसंगत पाऊले कोणी टाकली असतील तर त्याचा निर्णय पक्षाचे लोक बसून घेतली. जयंत पाटील आदींशी चर्चा करावी लागेल. एकटा निर्णय घेऊ शकत नाही. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. काहींची पदाधिकारी यांची नेमणूक मी केलेली आहे. जनरल सेक्रेटरी म्हणून सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक मी केलेली आहे. त्यांनी पक्षाच्या भल्यासाठी पाऊले टाकलेली नाहीत. त्यांनी जबाबदारी पार पाडलेली नाही. यामुळे त्यांच्यावरील पुढील कारवाई मला करावी लागेल, असा सूचक इशारा शरद पवार यांनी दिला. 

Web Title: Maharashtra Political Crisis Supriya Sule's first reaction after Ajit Pawar's rebellion; Tweeting the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.