Join us

Maharashtra Political Crisis: मनोहर जोशींचे घर जाळण्याचा आदेश कुणी दिला?; सदा सरवणकरांचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 12:50 PM

जे सरकार कामच करत नसेल तर अडचणीत येईल की नाही याची चिंता करण्याची वेळ नव्हती असं सदा सरवणकर म्हणाले.

मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला हादरा बसला. त्यात शिवसेना भवन ज्या मतदारसंघात आहेत त्यातील आमदार सदा सरवणकर हेदेखील शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांच्याविरुद्ध शिवसैनिक संतापल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यावर राष्ट्रवादी हा पक्ष सरकारमध्ये अग्रगण्य आहे. हा पक्ष आपली कामे करत नाही हे वाटल्यामुळेच शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असं सदा सरवणकर यांनी भाष्य केले आहे. 

सदा सरवणकर म्हणाले की, मी एकनिष्ठ हा मतदारांशी आहे. मतदारांची कामे होणार असतील तर मला आनंद आहे. आम्ही कुणीही शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या विरोधात नाही. मतदारसंघातील कामे होणार नसतील तर वेगळा मार्ग शोधावा असं वाटलं. जे कुणी आंदोलन करतायेत. मी विभागप्रमुख असल्याने ज्यांना पदे मिळाली नाहीत ती लोकं आहेत. सर्वसामान्यांची कामे होत नव्हती. आमदाराची घुसमट होत होती हे अनेक शिवसैनिकांना माहिती आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी काहीजण पुतळे जाळण्याचं काम करत आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी जनतेचा आमदार आहे, माझ्या विभागातील कामे होणार नसतील तर मी मतदारांसमोर जाणार कसं? माझ्या मतदारसंघात शिवडी रस्ता बनतोय, त्यात ३ हजार कुटुंब बाधित होत आहेत. या कुटुंबाला दुसरीकडे स्थलांतरित केले जात आहे. कुठलीही व्यवस्था न होता त्यांची घरे तोडली जाणार असतील तर त्यांना उत्तरं काय देणार? मतदारसंघातील लोक आक्रोश करत आहेत. सेना भवनाच्या बाजूला ५ हजार कुटुंब गेली १० वर्ष यातना सहन करतायेत, ५० पत्रे शासनाला दिले कुणीही मार्ग काढायला तयार नाही. आमदार म्हणून मी आणखी काय करायला हवं होतं? असा सवालही सरवणकरांनी विचारला. 

दरम्यान, जे सरकार कामच करत नसेल तर अडचणीत येईल की नाही याची चिंता करण्याची वेळ नव्हती. लोकं रस्त्यावर आली. मंत्री जितेंद्र आव्हाडांनी कधीही लक्ष दिले नाही. किंबहुना हे प्रश्न आणखी गुंतागुतीचे होतील यासाठी प्रयत्न केले. शिवसेना गिळंकृत करण्याचं काम राष्ट्रवादी करत आहे. हे सातत्याने आम्ही सांगत होतो असा आरोप सदा सरवणकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला. 

संजय राऊतांनीच आदेश दिले अन्...१९७९ पासून मी शिवसेनेत गटप्रमुख शाखाप्रमुख, विभाग प्रमुख पदावर सक्रीय आहेत. मी आजतागायत मतदारसंघ बांधला, एकनिष्ठ राहिलो आदेश बांदेकरासारखा उपरा येऊन उभा राहणार असेल तर काय करायला हवं होते? मनोहर जोशींनी तुझी तिकीट कापली, त्यांचे घर जाळ असा आदेश संजय राऊतांनी दिले. मला अडकवण्याचं काम राऊतांनी केले. अशावेळी मी काय करायला हवं होतं. आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत, कुणी समजवण्याचं आणि सांगण्याची गरज नाही. हे सगळे उपरे आहेत. मी विनासंरक्षण मतदारसंघात फिरून दाखवेन. शिवसैनिकांच्या सभेत मी सगळी व्यथा सांगितली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी बॅनर्स लावले, ते काढण्याचं काम ज्या अधिकाऱ्याने केले. तो दुसऱ्या दिवशी वर्षावर होता असं सदा सरवणकर यांनी म्हटलं. 

निष्ठावंत शिवसैनिकांचा रोष संजय राऊतांवरसामनात यांनी अग्रलेख लिहायचे आणि आम्ही संरक्षणासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरायचो. आम्ही विठ्ठलाशी एकनिष्ठ आहोत. आमच्या तक्रारी अनिल परब, अनिल देसाई, विनायक राऊतांकडे मांडल्या पण एकाही नेत्यांमध्ये धाडस नव्हते मंत्र्यांना फोन करून जाब विचारायची. संजय राऊत शिवसेना संपवतायेत हे जगजाहीर आहे. निष्ठावंत शिवसैनिकांचा रोष संजय राऊतांवर आहे. उपरे शिवसैनिक स्वार्थासाठी आंदोलन करतायेत. संजय राऊतांनी कुठली आंदोलने केली. २००२ मध्ये आले. सामना ऑफिस माझ्या नेतृत्वाखाली उभी राहिली. संजय राऊतांनी माझ्याबद्दल बोलू नका. संजय राऊत एकातरी आंदोलनात सहभागी झालेत का? असा सवाल सदा सरवणकर यांनी संजय राऊतांना विचारला. 

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेसंजय राऊतमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ